INDvsAUS | बीसीसीआयचा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत मोठा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने नागपूरमधील पहिला सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

INDvsAUS | बीसीसीआयचा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 4:49 PM

मुंबई : बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा इथे आयोजित करण्यात आला आहे. हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मात्र आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने या सामन्याचं ठिकाण बदलण्याचं निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सामना आता धर्मशाळा इथे होणार नसल्याचं माहिती मिळत आहे.

तिसरा सामन्याचं आयोजन कुठे?

इनसाइड स्पोर्ट्सनुसार, उभयसंघातील तिसरा सामना हा धर्मशाळाऐवजी मोहालीत खेळवण्यात येणार आहे. धर्मशाळेतील स्टेडियममध्ये नुकतंच दुरस्तीचं काम करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करणं यशस्वी झालं नाही. या मैदानात अखेरचा कसोटी सामना हा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली खेळवण्यात आला होता. बीसीसाआयमधील तज्ज्ञांनी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर सामन्याचं ठिकाण बदलण्याचं निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआय अधिकारी काय म्हणाला?

“दुर्देवाने या सामन्याचं ठिकाण बदलावं लागत आहे. सामन्याच्या आदल्या दिवसापर्यंत इथे सर्व तयारी होणार नाही. सद्यस्थितीत इथे सामना होऊ शकत नाही”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिली.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया मालिकेत आघाडीवर

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. भारताने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पहिल्या सामन्यात ऑलराउंडर रवींद्र जडेजाने उल्लेखनी कामगिरी केली.

जडेजाने जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात बॅटिंग करताना 185 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. जडेजाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पु्रस्काराने गौरवण्यात आलं.

दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.