IND vs AUS | फायनलआधी खुलासा, चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला किती धावा कराव्या लागतील?

IND vs AUS | या मैदानावरील 4 मॅचचा रेकॉर्ड काय आहे?. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या वर्ल्ड कपमधला पहिला सामना खेळला गेला होता. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने सुद्धा या मैदानावर एक-एक सामना खेळलाय. न्यूझीलंडने या मैदानावर पहिल्या सामन्यात इंग्लंडला हरवलं होतं.

IND vs AUS |  फायनलआधी खुलासा, चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला किती धावा कराव्या लागतील?
IND vs AUS Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 10:16 AM

मुंबई : टीम इंडियाचे चाहते मागच्या 12 वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो जवळ आलाय. वनडे वर्ल्ड कपच्या फायनलला आता 48 तासांपेक्षा कमी वेळ उरलाय. रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा फायनल सामना होईल. भारत-ऑस्ट्रेलियाच्या टीम आमने-सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. फक्त आता त्यांना ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करावा लागणार आहे. सगळ्यांच्य नजरा आता अहमदाबादचा पीच कसा असेल, त्यावर आहेत. किती स्कोर केला, तर विजय मिळेल, यावर नजर असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना होईल. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी 17 नोव्हेंबरला स्टेडियमवर जाऊन पीच कसा असेल? याचा आढावा घेतला.

आता हा पीच कसा असेल? त्या बद्दल उत्सुक्ता आहे. फायनल सामना नव्या पीचवर खेळवला जाणार की, आधीपासून वापरलेल्या पीचवर खेळवला जाईल, त्या बद्दल अजून स्पष्टत नाहीय असं पीटीआयने म्हटलं आहे. बीसीसीआयचे चीफ क्यूरेटर आशीष भौमिक आणि डेप्युटी तापोश चटर्जी यांच्या देखरेखीखाली ग्राऊंड स्टाफने पीच बनवलाय. त्याशिवाय बीसीसीआयचे जनरल मॅनेजर अबे कुरुविल्ला सुद्धा यावेळी उपस्थित होते. हा पीच काळ्या मातीचा आहे. सामन्यापणे असा पीच स्लो असतो. रिपोर्ट्नुसार पीचवर मोठ्या रोलरचा वापर करण्यात आलाय. फायनलच्या दिवशी विकेट स्लो होईल, असे संकेत त्यावरुन मिळतायत. म्हणजे धुवाधार बॅटिंग आणि धावांचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

किती धावा कराव्या लागतील?

या पीचवर पहिली बॅटिंग करताना जिंकण्यासाठी किती धावा हव्यात?. एका स्थानिक क्यूरेटरने याच उत्तर दिलय. इथे थोडी मोठी धावसंख्या होऊ शकते. पण सतत हिटिंग करता येणार नाही. क्यूरेटरने सांगितलं की, पहिली बॅटिंग करताना 315 धावा केल्या, तर ही धावसंख्या डिफेंड करता येऊ शकते. कारण चेज करण बिलकुल सोपं नसेल.

या वर्ल्ड कपमध्ये या मैदानावर रेकॉर्ड काय?

याच मैदानावर 5 ऑक्टोबरला टुर्नामेंटची सुरुवात झाली होती. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला हरवून शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर टीम इंडियाने या मैदानात आपला जलवा दाखवला. पाकिस्तानवर एकतर्फी 7 विकेटने विजय मिळवला. त्यानंतर मोदी स्टेडियमवर आणखी दोन सामने खेळले गेले. पण कुठलीही टीम 300 च्या पुढे जाऊ शकली नाही. इथे खेळल्या गेलेल्या 4 सामन्यात सर्वाधिक धावसंख्या 286 होती. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध या धावा केल्या होत्या. 33 धावांनी हा सामना जिंकला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.