Viral Video | विराट कोहली आणि तरुणीचा किस करतानाचा तो व्हीडिओ व्हायरल
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याला एक तरुणी किस करत असतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मुंबई : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. ही कसोटी मालिका भारतात होत आहे. या कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओत एक तरुणी विराट याला चक्क किस करतेय. या व्हीडिओमुळे नेटकरी विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हीला तुझं लक्ष कुठं आहे, असं प्रश्न विचारत आहेत.
विराटचे असंख्य चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सूक असतात. विराटसोबत सेल्फी काढणं हे अनेक चाहत्यांचं स्वप्न असतं. मात्र विराटच्या या चाहतीने चक्क कहर केला. तरुणीने संधी मिळताच विराटचा किस घेतला. मात्र हा किस खऱ्याखुऱ्या विराट याला घेतलेला नाही.
या तरुणीने विराटच्या पुतळ्याला किस घेतला आहे. विराटचा हा पुतळा मादाम तुसाद संग्रहालयातील असल्याचा दावा केला जात आहे
तरुणीकडून विराट कोहली याच्या पुतळ्याला किस
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) February 20, 2023
विराटच्या पुतळ्याला किस करणाऱ्या तरुणीचा व्हीडिओ @GemsOfSimps या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत 88 हजारपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.
दरम्यान विराट याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये आपली छाप सोडला आली नाही. टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 1 डावाने विजय झाला. विराटने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 12 धावा केल्या.
तसेच दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात विराटला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे विराटला 44 धावांवर माघारी परतावं लागलं होतं. तर दुसऱ्या डावात त्याने 20 रन्स केल्या.
विराटला आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.त्यामुळे टीम इंडियाला आणि त्याच्या चाहत्यांना उर्वरित 2 कसोटी सामन्यांमध्ये धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तिसरा कसोटी सामना हा 1-5 मार्च दरम्यान इंदूरमध्ये खेळवण्यात येणार आहे.
उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर.
चौथी कसोटी, 9-13 मार्च.