IND vs AUS 1st Odi Live Streaming | ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचं आव्हान, पहिला सामना फुकटात पाहता येणार
india vs australia 1st odi live streaming | टीम इंडियाने श्रीलंकेला अंतिम सामन्यात जिंकल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. जाणून घ्या पहिल्या सामन्याबाबत सर्वकाही
मोहाली | आशिया कप 2023 जिंकल्यानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका आहे. केएल राहुल पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद आहे. टीम इंडिया या सामन्यात अनुभवी खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलियाही मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलशिवाय पहिला सामना खेळणार आहे. हे दोघे दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत. या पहिल्या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना केव्हा?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना कुठे?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना हा पंजाब मोहालातील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर दुपारी 1 वाजता टॉस होणार आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर पाहता येईल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला सामना मोबाईलवर जिओ एपवर फ्री पाहता येईल.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.