IND vs AUS Test : Rahul dravid नाराज, पहिल्या टेस्ट मॅचआधी मोठी अपडेट

IND vs AUS Test : पहिला कसोटी सामना नागपूर येथे होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्स या कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहेत. दरम्यान पहिल्या कसोटीआधी एक महत्त्वाची अपडेट आहे.

IND vs AUS Test : Rahul dravid नाराज, पहिल्या टेस्ट मॅचआधी मोठी अपडेट
Rahul Dravid
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 7:50 AM

IND vs AUS Pitch Report : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारपासून कसोटी सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही टीम्समध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना नागपूर येथे होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्स या कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहेत. दरम्यान पहिल्या कसोटीआधी एक महत्त्वाची अपडेट आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड हे नागपूरमध्ये पहिल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या पीचवर नाराज असल्याची माहिती आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटने पहिल्या कसोटीसाठी तयार केलेल्या खेळपट्टीमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या जामठा स्टेडियममध्ये हा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

ट्रॅकमध्ये बदल करण्याची मागणी

यजमान टीम म्हणजे भारतीय संघ मागच्या काही दिवसांपासून इथे सराव करतोय. हेड कोच राहुल द्रविड यांनी ट्रॅकमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. राहुल द्रविड यांनी नागपूरची खेळपट्टी पाहिली. त्यावर ते समाधानी नव्हते. टीम इंडियाच्या मागच्या काही दिवसांपासून सेंटर विकेटवर प्रॅक्टिस करत आहे. आता पहिल्या कसोटीच्या तीन दिवस आधी राहुल द्रविड यांनी पीचमध्ये बदलाची मागणी केलीय.

टीम इंडियाच बलस्थान

असोशिएशनचे पदाधिकारी आणि क्युरेटर भारतीय टीमच्या मागणीनुसार, पीच बनवून देण्यासाठी दिवस-रात्र काम करतायत. नव्या बदलानुसार, साइट स्क्रीनमध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे. पूर्ण पाच दिवस कसोटी सामना चालेल, अशी खेळपट्टी बनवण्याचा आग्रह आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवण्याची सूचना आहे. स्पिन गोलंदाजी टीम इंडियाच बलस्थान आहे. रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असे अव्वल दर्जाचे गोलंदाज टीम इंडियाकडे आहेत.

आधीच फिरकीचा धसका

नागपूरची खेळपट्टी याआधी सुद्धा कसोटी सामन्यांमध्ये फिरकीला अनुकूल होती. तिसऱ्या, चौथ्या डावात इथे फलंदाजी करण आव्हानात्मक असतं. ऑस्ट्रेलियन टीमने आधीच फिरकीचा धसका घेतलाय. ऑस्ट्रेलियन टीमला वेगवान खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे, फिरकी गोलंदाजी खेळणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. ऑस्ट्रेलियन टीम एकही प्रॅक्टिस मॅच का नाही खेळली?

प्रॅक्टिस मॅचमध्ये बीसीसीआयकडून जी विकेट दिली जाते. प्रत्यक्ष सामन्याच्यावेळी मात्र तशी विकेट नसते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम यावेळी एकही प्रॅक्टिस मॅच खेळली नाही. कारण त्याचा काही उपयोग नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.