K L Rahul | केएल राहुल याचं स्टिंग ऑपरेशन, व्हीडिओ पाहून पोट धरुन हसाल
चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमधून टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले. या स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
मुंबई | भारतीय क्रिकेट विश्वात काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली, कारण होतं बीसीसीआय निवड समीतीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमधून टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले. या स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीमुळे चेतन शर्मा यांना निवड समितीच्या अध्यक्षपदावरुन दूर केलं होतं. मात्र पुन्हा 2 महिन्यांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या स्टिंगनंतर आणखी विनोदी स्टिंग ऑपरेशन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हीडिओत डमी केएल राहुल याने विनोदी पद्धतीने अनेक खुलासे केले आहेत. केएल राहुल हा सातत्याने फ्लॉप कामगिरीमुळे ट्रोल होतोय. या टीकेमुळे संतापलेला केएल राहुला याचा स्टिंग ऑपरेशन कसा असेल, याची कल्पना करुन हा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हीडिओतील तरुणाने अतिशय विनोदी पद्धतीने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या स्वभाव, शरीरयष्टी आणि सवयींनुसार गौप्यस्फोट केला आहे.
कथित केएल राहुल यांचं स्टिंगऑपरेशन
विराट कोहली याचे नकली सिक्स पॅक अॅब्स आहेत. त्याने जीएफएक्स करुन ते सिक्स पॅक अॅब्स तयार केले आहेत. हार्दिक पंड्या हा बिअरमध्ये पाणी टाकून पितो. असे एक ना अनेक विनोदी हास्यस्फोट या व्हीडिओतून करण्यात आले आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर सतिश राय याने केएल राहुल याचा काल्पनिक स्टिंग ऑपरेशनचा व्हीडिओ तयार केला आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत या व्हीडिओला 1.4 मिलिअन व्हीव्हूव्यूज आले आहेत.
दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1-5 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर.
चौथी कसोटी, 9-13 मार्च.