IND vs AUS : केएल राहुलच्या निवडीवर काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
IND vs AUS ODI Series : क्रिकेट पंडितांपासून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना हा निर्णय अजिबात पटलेला नाही. या निर्णयावरुन सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका सुरु आहे.
IND vs AUS ODI Series : केएल राहुल खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला सातत्याने संधी दिली जातेय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केलाय. क्रिकेट पंडितांपासून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना हा निर्णय अजिबात पटलेला नाही. या निर्णयावरुन सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका सुरु आहे. माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी केएल राहुल विरोधात आघाडीच उघडली आहे. त्याने टि्वटरवर राहुलचे आकडे शेअर करुन त्याची निवड अयोग्य असल्याचं सांगितलं. आता या वादात काँग्रेस नेते शशी थरुर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनच नाव घेऊन टीमच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.
काँग्रेस नेत्याने टि्वटमध्ये काय म्हटलय?
“संजू सॅमसनच काय? वनडेमध्ये 76 ची सरासरी असूनही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे स्क्वाडमधून वगळलं. ज्या खेळाडूचं प्रदर्शन चांगलं नाहीय, त्याला बऱ्याच संधी देणं समजू शकतो पण त्याची किंमत प्रतिभावान खेळाडूला चुकावावी लागतेय हे योग्य नाहीय” असं शशी थरुर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.
टीम इंडियाकडून शेवटचा सामना कधी खेळला?
संजू सॅमसन केरळचा खेळाडू आहे. शशी थरुर यांनी नेहमीच सॅमसनच तोंडभरुन कौतुक केलय. शशी थरुर यांनी संजू सॅमसनच्या बाजूने बोलण्याची ही पहिली वेळ नाहीय. संजू सॅमसन टीमच्या इंडियाच्या वनडे आणि टी 20 टीमच्या योजनेचा भाग आहे. पण सध्या तो टीम बाहेर आहे. संजू सॅमसन यावर्षी 3 जानेवारीला मुंबईत श्रीलंकेविरुद्ध टी 20 चा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम बाहेर गेला.
And what about @IamSanjuSamson ? Averaging 76 in ODIs and yet again omitted from the ODI squad against Australia. It’s all very well to give non-performers a long rope but surely not at the expense of talented performers? https://t.co/tg56JJMTue
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 21, 2023
राहुलच्या प्रदर्शनात सातत्याचा अभाव
केएल राहुलने वर्ष 2022 मध्ये फार चांगली कामगिरी केलेली नाहीय. जवळपास निम्म वर्ष तो दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. त्यानंतर आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने विशेष कामगिरी केली नाही. त्याने काही अर्धशतक जरुर फटकावली. पण स्ट्राइक रेट आणि धावांमध्ये सातत्य दिसलं नाही. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. मोठ्या सामन्यात केएल राहुलच प्रदर्शन खूपच खराब होतं. राहुलची कामगिरी कशी आहे?
केएल राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू दोन कसोटी सामन्यात फक्त 38 धावा केल्या आहेत. त्याने पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात सहा इनिंगमध्ये 29.60 च्या सरासरीने एका अर्धशतकाच्या मदतीने 148 धावा केल्या आहेत. मागच्यावर्षी 10 वनडे मॅचेसमध्ये 27.88 च्या सरासरीने त्याने 251 धावा केल्या. यात दोन अर्धशतकं आहेत.