IND vs AUS T20I Head To Head | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात वरचढ कोण?

India vs Australia T20I Head To Head Records | मॅथ्यू वेड याच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हात करणार आहे. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

IND vs AUS T20I Head To Head | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात वरचढ कोण?
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 5:56 PM

मुंबई | 13 व्या वनडे वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी 20 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्यांदाच सूर्यकुमार यादव याला कॅप्टन करण्यात आलं आहे. तर श्रेयस अय्यर यालाही प्रमोशन देण्यात आलं आहे. श्रेयस अय्यर शेवटच्या 2 सामन्यांमध्ये उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तर पहिल्या 3 सामन्यात ऋतुराज गायकवाड व्हाईस कॅप्टन असणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिकेतील कामगिरी कशी आहे हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया हेड टु हेड रेकॉर्ड

आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडिया टी 20 मध्ये ऑस्ट्रेलियावर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर कांगारु 10 सामन्यात विजय झाली आहेत. तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही. तसेच गेल्या 5 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 3 आणि ऑस्ट्रेलियाने 2 सामने जिंकले आहेत.

एकूण 10 टी 20 मालिका

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 10 टी 20 मालिका खेळवण्यात आल्या आहेत. टीम इंडिया 10 पैकी सर्वाधिक मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियाला 5 मालिकांमध्ये विजय मिळाला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 3 सीरिजमध्ये बाजी मारली आहे. तसेच 3 मालिका बरोबरीत राहिल्या आहेत.

भारतात टीम इंडियाच भारी

दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारतात 26 पैकी 10 सामने खेळले आहेत. इथेही टीम इंडिया सरस राहिली आहे. टीम इंडियाने या 10 मधून 6 सामन्यांमध्ये कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. तर कांगांरुंनी 4 मॅच जिंकल्या आहेत.

टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन एब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.