INDvsAUS : बुमराह, जाडेजा आणि अय्यर केव्हा परतणार? जाणून घ्या

श्रीलंका आणि न्यूझीलंडचा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS : बुमराह, जाडेजा आणि अय्यर केव्हा परतणार? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:52 PM

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेनंतर न्यूझीलंडचाही टी 20 आणि एकदिवसीय मालिकेत सूपडा साफ केला. श्रीलंका आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा विश्वास वाढलेला आहे. आता टीम इंडियासोबत भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध कसोटी आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया आणि चाहत्यांना ऑलराउंडर रवींद्र जाडेजा, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि बॅटर श्रेयस अय्यर कधी परतणार याची उत्सूकता लागून राहिली आहे. या तिघांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

रवींद्र जाडेजा

जाडेजाला ऑगस्ट 2022 मध्ये आशिया कप स्पर्धेत दुखापत झाली होती. तेव्हापासून जाडेजा टीम इंडियामधून बाहेर आहे. मात्र आता जाडेजाला एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं आहे.

क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार, एनसीएच्या मेडिकल टीमने जाडेजाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. जाडेजा नागपुरात टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये दाखल होईल. जाडेजानं नुकतंच रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून खेळताना 7 विकेट्स घेतल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला लवकरच फिटनेस सर्टिफिकेट मिळणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बुमराहने एनसीएत बॉलिंगला सुरुवात केली आहे. या सरावदरम्यान बुमराहला काही त्रास झाला नाही, तर तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतो.

श्रेयस अय्यर

मुंबईकर बॅट्समन श्रेयस अय्यर अजूनही पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. श्रेयसला पाठीच्या त्रासामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं होतं. मात्र श्रेयस अजूनही दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही.

दरम्यान 9 फेब्रुवारीपासून टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 9 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. हा पहिला सामना नागूपरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.