IND vs AUS Test : कॅप्टन Pat Cummins चा मोठा निर्णय, ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका

IND vs AUS Test : नागपूर पाठोपाठ काल दिल्ली कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियन टीम आधीच अडचणीत असताना, आता त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

IND vs AUS Test : कॅप्टन Pat Cummins चा मोठा निर्णय, ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका
pat cummins
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:15 AM

IND vs AUS Test Series : भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमचा सलग दोन कसोटी सामन्यात पराभव झाला आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ते 2-0 ने पिछाडीवर पडले आहेत. नागपूर पाठोपाठ काल दिल्ली कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियन टीम आधीच अडचणीत असताना, आता त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स मायदेशी परतणार असल्याच वृत्त आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतला आहे. एका घरगुती कारणामुळे ऑस्ट्रेलियन कॅप्टनने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्सच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायदेशी रवाना होणार आहे.

तिसरा कसोटी सामना कुठे होणार?

ऑस्ट्रेलियन टीम सीरीजमध्ये पिछाडीवर पडलेली असताना पॅट कमिन्सचा हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा झटका आहे. नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीही टीम इंडियाने 3 दिवसात जिंकली. आता दोन्ही टीम्समध्ये तिसरा कसोटी सामना इंदूर येथे होणार आहे. पण त्याआधी कमिन्स घरी परतणार आहे.

पॅट कमिन्स घरी जाणार, पण….

न्यूजकॉर्पच्या हवाल्याने Fox cricket ने 29 वर्षाचा पॅट कमिन्स फक्त 2 दिवसांसाठी सिडनीला जाणार असल्याच म्हटलं आहे. त्यानंतर तो पुन्हा भारतात येईल. इंदूरमध्ये 1 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होईल. पॅट कमिन्स कौटुंबिक कारणासाठी मायेदशी परत जातोय. पण तो तिसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

या सीरीजमध्ये कमिन्सची कामगिरी कशी आहे?

भारताने ऑस्ट्रेलियन टीमला दिल्ली कसोटीत पराभवाच पाणी पाजून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी रिटेन केली आहे. पॅट कमिन्स सीरीजच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये विशेष प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. त्याने 39.66 च्या सरासरीने फक्त 3 विकेट घेतल्यात.

कमिन्सच्या आधी आणखी एक क्रिकेटर मायदेशी परतला

कमिन्सच्या आधी मिचेल स्वीपसन मागच्या आठवड्यात घरी परतला. घरी पहिल्या बाळाचा जन्म झाल्याने स्वीपसन मायदेशी परतला. स्वीपसनच्या जागी ऑस्ट्रेलियन टीममध्ये मॅथ्यू कुहेमनचा समावेश करण्यात आला. मिचेल स्वीपसनही तिसऱ्या टेस्टआधी ऑस्ट्रेलियन टीममध्ये सहभाही होऊ शकतो, न्यूजकॉर्पने हे वृत्त दिलय. पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन टीमने सरासरीपेक्षाही खराब खेळ केलाय. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर ऑस्ट्रेलियन टीमने शरणागती पत्करली. त्यामुळेच नागपूर असो किंवा दिल्ली 3 दिवसात पराभवाचा सामना करावा लागला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.