IND vs BAN 2nd T20i: बांगलादेशने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग

India vs Bangladesh 2nd T20i Toss: टीम इंडियाने बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

IND vs BAN 2nd T20i: बांगलादेशने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग
ind vs ban 2nd t20i toss
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 7:00 PM

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे.या दुसऱ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशचा कॅप्टन नजमुल शांतोने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या स्टेडियममधील एव्हरेज स्कोअर हा 235 इतका आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांकडून विस्फोटक खेळी पाहायला मिळणार आहे.

कॅप्टन सूर्याने दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सूर्याने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेइंग ईलेव्हन कायम राखली आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने एकमेव बदल केला आहे. तांझिम हसन साकीब याला शोरीफूल याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

भारतीय फंलदाजांना रोखण्याचं आव्हान

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग केला होता. त्यामुळे मोजक्याच फलंदाजांना बॅटिंगची संधी मिळाली होती. मात्र आता या सामन्यात टीम इंडियाची आधी बॅटिंग आहे. त्यात ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आणि मदतशीर आहे. या खेळपट्टीवर 235 एव्हरेज स्कोअर आहे. तसेच टीम इंडियाकडे तोडीसतोड फलंदाज आहे. त्यामुळे आता बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

बांगलादेशचा फिल्डिंगचा निर्णय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.