Video : कानपूर कसोटीत बांगलादेशचा फॅन टायगर रॉबीला मारहाण, थेट रुग्णालयात केलं दाखल

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात सुरु आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर खराब प्रकाशमानामुळे सामना थांबवावा लागला आहे. असं असताना एक विचित्र घटनादेखील स्टेडियममध्ये घडली आहे. बांगलादेशचा सुपर फॅन असलेल्या टायगर रॉबीला मारहाण करण्यात आली आहे.

Video : कानपूर कसोटीत बांगलादेशचा फॅन टायगर रॉबीला मारहाण, थेट रुग्णालयात केलं दाखल
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 2:54 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना सुरु होण्यास पावसामुळे दिरंगाई झाली. त्यानंतर नाणेफेकीचा कौल झाला आणि भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 35 षटकं टाकत 107 धावांवर 3 गडी बाद केले. मात्र पुन्हा एकदा खराब प्रकाशमानामुळे सामना थांबवण्यात आला. या सामन्यावर आधीच नैसर्गिक संकट ओढावलं आहे. दुसरीकडे, सामन्यात काही अक्रित घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. कारण बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारतात प्रचंड राग आहे. इतकंच काय तर भारतात बांगलादेशने सामना खेळण्यास येऊ नये असंही काही संघटनांनी आवाहन केलं होतं. त्या अनुषंगाने कानपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असं असताना कानपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा सुपर फॅनची स्टेडियममधील फॅन्ससोबत तू तू मै मै झाली. यामुळे फॅन्स हाणामारीवर उतरले आणि भिडले. यात बांगलादेशचा सुपर फॅन असलेला टायगर रॉबी जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

बांगलादेशचा सुपर फॅन असलेल्या टायगर रॉबीने सांगितलं की ही घटना लंच ब्रेक दरम्यान झाली. टायगर रॉबी बांगलादेशच्या सर्व सामन्यांना प्रोत्साहित करण्याासटी मैदानात येत असतो. त्याच्या संपूर्ण शरीरावर वाघासारखे पट्टे मारलेले असतात. या वेशभूषेसह तो उपस्थितांचं लक्ष वेधून घेतो. कानपूर कसोटीतही या वेशभूषेसह टायगर रॉबी पोहोचला होता. रॉबीने सांगितलं की, ‘त्यांनी माझ्या पाठीवर आणि पोटाच्या खालच्या भागावर मारले. मला श्वासही घेता येत नाही.’

टायगर रॉबीच्या आरोपानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. पोलिसांनी रॉबीच्या आरोपांची शहनिशा करण्यासाठी अधिकृत सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानंतर नेमकी घटना काय आहे? आणि काय घडलं ते समोर येईल.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा.
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?.
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका.
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?.
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती.
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं.