Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचं भारतासमोर विजयासाठी 94 धावांचं आव्हान, जडेजा-अश्विन जोडीची कमाल

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला असला तरी भारताने चौथ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलं. तसेच दुसऱ्या डावात बांगलादेशला 146 धावांवर गुंडाळलं.

बांगलादेशचं भारतासमोर विजयासाठी 94 धावांचं आव्हान, जडेजा-अश्विन जोडीची कमाल
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 12:26 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर सामना ड्रॉ होईल अशीच शक्यता होती. पण टीम इंडियाने जबरदस्त खेळी केली. चौथ्या दिवशी कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 233 धावांवर आटोपला होता. त्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकात 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. 9 विकेट गेल्यानंतर भारताने डाव घोषित केला. 52 धावांचा पल्ला गाठतानाच बांगलादेशच्या 3 विकेट गेल्या होत्या. शदमन इस्लामने अर्धशतकी खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. खासकरून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीपुढे बांगलादेशी फलंदाजांनी नांगी टाकली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 146 या धावांवर बाद झाला. यातून 52 धावांची भारताची आघाडी वगळता फक्त 94 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान भारतीय सहज गाठेल असं दिसत आहे. त्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मदत होईल.

भारताकडून जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. बांगलादेशकडून शदमन इस्लामने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्यानंतर मुशफिकुर रहिमने 37 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राहणार आहे. तसेच अंतिम फेरीच्या दिशेने प्रवास सुरु होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.