IND vs BAN : तिसऱ्या सामन्यासह माजी कर्णधाराचा टी20I क्रिकेटला अलविदा, शेवटच्या सामन्यात 8 धावा आणि 1 विकेट
India vs Bangladesh 3rd T20i Retirement : टीम इंडियाने बांगलादेशवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 133 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर दिग्गज ऑलराउंडर निवृत्त झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा कसोटीनंतर टी 20I मालिकेतही सुपडा साफ केला आहे. कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवल्यानंतर टी 20I मालिकेत 3-0 अशा फरकाने पराभूत केलं आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 298 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे हा सामना 133 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा 2024 वर्षातील 21 वा टी20I विजय ठरला. या सामन्यानंतर माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलूने टी 20I क्रिकेटला अलविदा केला आहे.
बांगलादेशचा माजी कर्णधार आणि अनुभवी ऑलराउंडर महमुदुल्लाह टी20I क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. महमुदुल्लाहने अखेरच्या सामन्यात 9 बॉलमध्ये 1 फोरसह 8 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव महमुदुल्लाह याचा शेवटचा शिकार ठरला. महमुदुल्लाहने या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. महमुदुल्लाहने दुसऱ्या सामन्याच्या एकदिवसाधी 8 ऑक्टोबरला तिसऱ्या सामन्यानंतर टी 20I क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. महमुदुल्लाहने एकदिवसीय क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्यासाठी टी20I फॉर्मेटला अलविदा करत असल्याचं सांगितलं होतं.
महमुदुल्लाहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महमुदुल्लाह बांगलादेशच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक होता. महमुदुल्लाहने बांगलादेशचं 50 कसोटी 232 एकदिवसीय आणि 140 टी20I सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. महमुदुल्लाहने कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतकं आणि 16 अर्धशतकांसह 2 हजार 914 धावा केल्या आहेत. तर 140 टी20I सामन्यांमध्ये या दिग्गजाच्या नावावर 129 डावात 8 अर्धशतकांसह 2 हजार 435 धावांची नोंद आहे. तर महमुदुल्लाहने 232 एकदिवसीय सामन्यांमधील 202 डावात 4 शतकं आणि 28 अर्धशतकांसह 5 हजार 386 धावा केल्या आहेत. महमुदुल्लाहने कसोटी, एकदिवसीय आणि टी20I क्रिकेटमध्ये अनुक्रमे 43, 82 आणि 40 विकेट्सही घेतल्या आहेत.
महमुदुल्लाह याला सहकाऱ्यांकडून निरोप
A heartfelt farewell for Mahmudullah as he plays his last T20 international against India. The Bangladesh cricket team honors him with a special crest to mark the occasion.#BCB #Cricket #INDvBAN #T20 pic.twitter.com/y5rW8eF6b6
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 12, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.