IND vs BAN : “तेव्हा टीम मॅनेजमेंटने…”, संजू सॅमसनने अखेर बोलून दाखवलंच

Sanju Samson IND vs BAN 3rd T20i : संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर सडकून टीका गेली. मात्र संजूने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात झंझावाती 111 धावांची शतकी खेळी केली.

IND vs BAN : तेव्हा टीम मॅनेजमेंटने..., संजू सॅमसनने अखेर बोलून दाखवलंच
sanju samsonImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 2:57 AM

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी20I सामन्यात 133 धावांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. संजूने 40 चेंडूत शतकी खेळी केली. संजू टीम इंडियाकडून टी20I मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संजूने एकूण 111 धावांची खेळी केली. संजूने या खेळीत एकाच षटकात सलग 5 सिक्स खेचले. संजूच्या या खेळीसह इंडिया टी 20I क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक 297 धावा करणारी कसोटी क्रिकेट खेळणारी टीम ठरली. संजू आणि सूर्यकुमार या दोघांनी केलेल्या भागीदारीची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या विजयानंतर संजू सॅमसन याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. संजू या विजयानंतर भरभरून बोलला. ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि सहकारी खेळाडू माझ्यासाठी फार आनंदी असल्याचं संजूने म्हटलं. मी यापेक्षा आणखी चांगली कामगिरी करु शकलो असतो, असं सूर्याने म्हटलं.

संजू काय म्हणाला?

“मला या मैदानात खेळण्याचा फार अनुभव आहे. दबावात आणि अपयशाचा सामना कसा करायचा हे मला माहित आहे. देशासाठी खेळताना तुमच्यावर दडपण असतं. ते दडपण होतं, मात्र मला खेळायचं होतं. आपल्याला बेसिकवर लक्ष द्यायचंय याची मी स्वत:ला सातत्याने आठवण करुन देत होतो. मी गेल्या मालिकेत 2 वेळा शून्यावर बाद झालो. तेव्हा टीम मॅनेजमेंटने मला पाठिंबा दिला”, असं संजूने सांगितलं.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने विक्रमी 297 धावा केल्या. संजूने सर्वाधिक 111 तर कॅप्टन सूर्यकुमार यादवने 75 धावांचं योगदान दिलं. तर हार्दिक पंड्याने 47 धावांची खेळी केली. बांगलादेशला प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 164 रन्सच करता आल्या. बांगलादेशकडून तॉहिद हृदॉयने 63 तर लिटन दासनने 42 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

हे सुद्धा वाचा

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.