IND vs BAN: टीम इंडिया-बांगलादेश दुसरा टी 20I सामना केव्हा? टीव्ही-मोबाईलवर इथे पाहा
India vs Bangaldesh 2nd T20i Live Streaming: टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असल्याने दुसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. या सामन्याबाबत सर्वकाही जाणून घ्या.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने विजयी सलामी देत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांनी या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. बांगलादेश मालिकेत पिछाडीवर असल्याने त्यांचा नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वात विजय मिळवून 1-1 ने बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे. हा दुसरा सामना केव्हा आणि कुठे पाहता येईल? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना बुधवारी 9 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.