टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ती?

yashasvi jaiswal girlfriend Video : गरीब घरातून वर आलेला यशस्वी जयस्वाल आता टीम इंडियाचा मुख्य खेळाडू आहे. आगामी बांगलादेशसाठी त्याची निवड झाली आहे. सोशल मीडियावर जयस्वालच्या गर्लफ्रेंडची जोरदार चर्चा होत आहे. कोण आहे ती तरूणी जाणून घ्या.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ती?
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 6:33 PM

टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालकडे भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून पाहिलं जातं. आगामी बांगलादेशविरूद्धच्या मलिकेसाठीही जयस्वाल याची निवड झालीये. कष्ट करून आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर यशस्वीने टीम इंडियामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याच्याकडे टीमचा मुख्य ओपनर म्हणून पाहिलं जातं. मात्र जयस्वाल क्रिकेटमुळे नाहीतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यशस्वी जयस्वालचा एका विदेशी तरूणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील तरूणी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे.

यशस्वी जयस्वाल याच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव मैडी हैमिल्टन आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघे रिलेशनमध्ये असल्याची माहिती आहे. हैमिल्टन ही ब्रिटनची रहिवासी असून ती आता शिकत आहे. भारतामध्ये सामने असताना हैमिल्टन त्याला चीअर करण्यासाठी येते. आता मागे जानेवारीमध्ये झालेल्या भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीवेळी ती स्टँडमध्ये दिसली होती.

दोघांच्या रिलेशनबाबत आतापर्यंत कोणीही काही स्पष्टीकरण दिलेले नाही. दोघांचा एकमेकांसोबत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  आयपीएल 2024 मध्ये मैडी हैमिल्टनअनेक सामन्यांमध्ये त्याला चीअर करताना दिसली होती. जयस्वाल आणि हैमिल्टन अनेकदा एकमेकांसोबत दिसले आहेत. मैडी हैमिल्टनचा भाऊ हेनरी हा यशस्वी जयस्वाल याचा चांगला मित्र आहे.

यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्ये खोऱ्याने धावा काढल्या होत्या. पाच कसोटी सामन्यात 712 धावा त्याने केल्या होत्या. यामध्ये त्याने दोन द्विशतके ठोकली होतीत. यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये यशस्वीने 15 सामन्यांमध्ये 453 धावा केल्या होत्या. यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये 9 सामन्यांमध्ये 16 डावांमध्ये 68.53 च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. 214 यशस्वीची वैयक्तिक धावसंख्या आहे.

बांगलादेशसोबत भारतीय संघाचे दोन कसोटी सामने होणार आहेत.  यामधील पहिला सामना 19 सप्टेंबर आणि दुसरा सामना 27 सप्टेंबरला पार पडणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून त्यामध्ये यशस्वी जयस्वाल याचाही समावेश आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.