IND vs ENG | सरफराज खानची प्रतिक्षा आणखी वाढली, रजत पाटीदारला पदार्पणाची संधी
India vs England 2nd Test | टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडून दुसऱ्या कसोटी सामन्यात 1-1 खेळाडूने पदार्पण केलं आहे. टीम इंडियाकडून कुणाला मिळाली डेब्यूची संधी?
विशाखापट्टणम | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी साम्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने याने इंग्लंड विरुद्ध पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्यासाठी 2 बदल केले. तर टीम इंडियाने 3 बदल केलेत. दोन्ही संघांकडून प्रत्येकी 1 खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे. इंग्लंडकडून बशीर अहमद याने वयाच्या 20 व्या वर्षी इंग्लंड टीममध्ये स्थान मिळवलंय. बशीर अहमद हा इंग्लंडसाठी खेळणारा 713 वा खेळाडू ठरला आहे.
तर टीम इंडियाकडून एका जागेसाठी दोघांमध्ये चुरस होती. सरफराज खान आणि रजत पाटीदार या दोघांमध्ये ही चढाओढ होती. मात्र टीम मॅनेजमेंटने विराट कोहली याच्या जागेवर संधी मिळालेल्या रजत पाटीदार याच्यावर विश्वास दाखवला. रजतने कसोटी पदार्पण केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सरफराज खान याच्यावर अन्याय झाला आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियात निवड झाली. आता सरफराज डेब्यूपासून एक पाऊल दूर होता. मात्र त्याला संधी न मिळाल्याने त्याची प्रतिक्षा आता आणखी वाढली आहे.
शुबमन गिल याच्यावर मेहेरनजर
दरम्यान पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतरही दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका करुन आपली छाप उमटवणाऱ्या सरफराजला संधी मिळाली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच संधी मिळूनही वारंवार फ्लॉप झालेल्या श्रेयस अय्यर याचाही प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सरफराज चाहत्यांना संताप झाला आहे.
रजत पाटीदार याचं कसोटी पदार्पण
Congratulations to Rajat Patidar who is all set to make his Test Debut 👏👏
Go well 👌👌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/FNJPvFVROU
— BCCI (@BCCI) February 2, 2024
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.