AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 3rd ODI: हार्दिक-ऋषभने इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, पंतची सेंच्युरी, भारताने सीरीज जिंकली

IND vs ENG 3rd ODI: मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत भारताने इंग्लंडचा पाच विकेटने पराभव केला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे नायक ठरले.

IND vs ENG 3rd ODI: हार्दिक-ऋषभने इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, पंतची सेंच्युरी, भारताने सीरीज जिंकली
Hardik-rishabh
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 11:07 PM

IND vs ENG 3rd ODI: मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) पाच विकेटने पराभव केला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले. ऋषभ पंतने (Rishabh Pant) शानदार सेंच्युरी झळकावली. त्याने 113 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या. यात 16 चौकार आणि दोन षटकार आहेत. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 260 धावांचे लक्ष्य भारताने 42.1 षटकात पूर्ण केलं. भारताचा डाव संकटात असताना ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने विजय मिळवून दिला. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताची टॉप ऑर्डर आजही कोसळली. पाच षटकात भारताच्या दोन बाद 21 धावा झाल्या होत्या. दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन माघारी परतले होते. रोहित शर्मा चांगला खेळत होता. पण रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर स्लीप मध्ये त्याने रुटकडे झेल दिला, रोहितने 17 चेंडूत 17 धावा केल्या. यात चार चौकार आहेत. शिखर धवन अवघ्या 1 रन्सवर टॉपलीच्या गोलंदाजीवरच झेलबाद झाला. विराट कोहली (17) आणि सूर्यकुमार यादव (16) धावांवर आऊट झाला. 4 बाद 72 स्थिती असताना, हार्दिक-ऋषभने डाव सावरला. ऋषभने खेळपट्टीवर सेट होण्यासाठी आधी वेळ घेतला. नंतर मात्र त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यांची गोलंदाजी फोडून काढली. ऋषभ पंत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. ऋषभने वनडे मध्ये आज पहिलं शतक झळकावलं.

हार्दिक पंड्या जबरस्त खेळला

हार्दिक पंड्याने आज बॅट आणि बॉल दोघांनी कमाल दाखवली. हार्दिकने आधी गोलंदाजी करताना 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट काढल्या. यात तीन निर्धाव षटक होती. यावरुन हार्दिकच्या भेदक माऱ्याची कल्पना येते. फलंदाजी करताना त्याने 55 चेंडूत 71 धावा फटकावल्या. यात 10 चौकार होते. ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने भारताच्या विजयाचा पाया रचला. हार्दिकने आज चौफेर फटकेबाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला अनेकदा हुक फटक्याच्या मोहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने जमिनी लगत फटके खेळले. त्याने पंचवर खूप सुंदर पद्धतीने चौकार वसूल केले. कार्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. स्टोक्सने त्याचा जबरदस्त झेल घेतला.

हार्दिकने जमलेल्या जोड्या फोडल्या

हार्दिक पंड्याने आज मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिले. एखादी महत्त्वाची पार्ट्नरशिप आकाराला येत असताना, त्याने विकेट काढले.एखादी महत्त्वाची पार्ट्नरशिप आकाराला येत असताना, त्याने विकेट काढले. इंग्लंडची अवस्था 2 बाद 12 झाली होती. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या बेन स्टोक्सने जेसन रॉय सोबत मिळून डाव सावरला. रॉय आणि स्टोक्सची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अखेर ही जोडी फोडून भारताला तिसरं यश मिळवून दिलं. बटलर आणि लिव्हिंगस्टोन भारतासाठी धोकादायक ठरु शकले असते. पण या दोन्ही विकेट पंड्याने एकाच ओव्हरमध्ये म्हणजे 37 व्या षटकात काढल्या. हे दोन्ही झेल मिडविकेटला रवींद्र जाडेजाने टिपले. जाडेजाने हे झेल घेताना, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला.

पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.