IND vs ENG : रनआऊट झाल्यानंतर सरफराज खानने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानला धावचीत होत तंबूत परतावं लागलं. सरफराजची खेळी पाहता शतक ठोकेल असंच वाटत होतं. पण रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावचीत होत तंबूत परतावं लागलं. यानंतर पत्रकार परिषदेत सरफराज खानने आपलं मत व्यक्त केलं.
मुंबई : तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाची पकड दिसली. कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांनी दिवस गाजवला. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केली. तर सरफराज खाने 62 धावा करू धावचीत झाला. खरं तर पदार्पणाच्या सामन्यात सरफराज खानची बॅट चांगली तळपताना दिसली. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याला कामी आला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांवर हावी झाला होता. असं सर्व असताना रवींद्र जडेजाच्या एका चुकीमुळे सरफराज खानला धावचीत होत तंबूत परतावं लागलं . सरफराज खानचा डाव 62 धावांवर आटोपला. खरं तर सरफराजची फलंदाजी पाहता आरामात शतक होईल असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण दुर्दैवाने बाद होत तंबूत परतावं लागलं. कर्णधार रोहित शर्मा यालाही राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर फेकून राग व्यक्त केला. पण सामन्यानंतर सरफराज खानने या सर्व गोष्टींवर पडदा टाकला. सरफराज खानने पत्रकार परिषदेत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रनआऊटबाबत त्याने आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं.
“थोडा गैरसमज होता. पण हा खेळाचा भाग आहे. कधी धावपळ होते, कधी धावपळ असते, तर कधी नसते. त्यामुळे हे सर्व चालूच राहील. तो म्हणाला की थोडासा गैरसमज झाला होता. आणि मी म्हणालो की ते ठीक आहे. असे घडत असते, असे घडू शकते. त्यात मोठे काहीच नाही.”, असं सरफराज खान रनआऊटवर बोलला. आता दुसऱ्या दिवशी भारताने 400 धावांचा पल्ला गाठला तर गोलंदाजांना आणखी बळ मिळेल. तसेच पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधीही असेल.
सरफराज खानने टीम इंडियाकडून खेळताना कसं वाटलं याबाबतही सांगितलं. “माझे वडील पहिल्यांदा सामना पाहण्यासाठी येणार नव्हते. अभिमानाचा क्षण असल्याने काही लोकांनी त्यांच मन वळवलं. त्यामुळे ते मैदानात सामना पाहण्यासाठी आले. त्यांनी मला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे भावुक झाले. माझी पत्नीही खूप भावूक झाली होती. माझ्या डोक्यावरून वजन कमी झाल्यासारखे वाटते. इतकी वर्षे त्याने माझ्यावर जे काम केले, त्यांची मेहनत फळास आली.”, असं सरफराज खान याने सांगितलं.