IND vs ENG Playing 11 | रोहित शर्मा म्हणाला आताच प्लेइंग 11 सांगणार नाही पण बोलता बोलता घेतलीत ‘या’ 3 खेळाडूंची नावं
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माकडून मोठा खुलासा झाला आहे. रोहित म्हणाला नाही सांगणार पण जवळपास तीन खेळाडूंची नावं फोडली आहेत.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेमध्ये प्लेइंग 11 बाबत बोलता-बोलता तीन खेळाडूंची नावं सांगून गेला आहे. हैदबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर पहिला सामन्यात तीन फिक्स खेळाडू कोण असतील जाणून घ्या.
रोहितने घेतली ‘या’ खेळाडूंची नावं!
प्लेइंग 11मध्ये तिसरा स्पिनर म्हणून संघात कोणाची निवड करावी यावर खूप जास्त चर्चा झाली. टीम मॅनेजमेंटने तिसरा स्पिनर म्हणून कोणाची निवड केली याबाबत मी आताच काही सांगणार नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला. हैदराबादचं पिच पाहता त्यावर कुलदीप यादव याला मदत मिळू शकते. कारण त्याच्या बॉलिंगमध्ये विविधता असल्याने त्याला फायदा होईल. आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी नेहमी आपल्या कामगिरीमध्ये सातत्य दाखवलं आहे. त्यामुळे कुलदीपला कसोटीमध्ये जास्त संधी मिळाली नसल्याचं रोहितने सांगितलं.
रोहित शर्मा ज्या प्रकारे बोलला त्यावरून एक लक्षात येतं की, प्लेइंग 11 मध्ये आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे. तिसरा स्पिनर खेळवण्यामध्ये कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यात कोणाची निवड करावी हा निर्णय टीम मॅनेजमेंटला जड गेला. तसं पाहायला गेलं तर अक्षर पटेल याला झुकतं माप दिलं जावू शकतं. कारण संघाला बॅटींग लाईनअपमध्ये आणखी मजबूत करायची असेल तर बापूला म्हणजेच अक्षर याची निवड करण्याची जास्त शक्यता आहे.
दरम्यान, कुलदीप यादव असा स्पिनर आहे जो एकट्याच्या दमावर संपूर्ण सामना फिरवू शकतो. पिचवर त्याला मदत मिळाली तर तो आणखीनच घातक गोलंदाज होता. कित्येक सामन्यांमध्ये कुलदीप हा जायंटकिलर ठरला आहे. पहिल्या कसोटीमध्ये कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.