Video: विराट कोहलीच्या चाहत्याने रोहित शर्मासोबत भर मैदानात केलं असं काही!
भारत इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड आहे. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 246 धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यानी पहिल्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. असं सर्व काही चांगलं सुरु असताना विराटच्या चाहत्याने एन्ट्री मारली आणि सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसली. इंग्लंडचा संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी तंबूत परतला. त्यामुळे पाच दिवसांच्या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. इंग्लंडला सर्वबाद 246 धावा करता आल्या. भारताकडून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या वाटेला प्रत्येकी दोन गडी आले. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या 246 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला होता. पहिल्या गड्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोघांनी मिळून 80 धावा केल्या. पण रोहित शर्माला 24 धावा करून तंबूत परतावं लागलं. जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्टोक्सने त्याचा झेल घेतला आणि तंबूत पाठवलं. असं सर्व असताना सामन्यात एक विचित्र क्षण पाहायला मिळाला.
विराट कोहलीचा एक चाहत्याने मैदानात धाव घेतली आणि रोहित शर्माचे पाय पकडले. त्या चाहत्याने विराट कोहलीची 18 नंबरची जर्सी परिधान केली होती. त्यावर विराट कोहली आणि 18 नंबर लिहिलेला होता. रोहित शर्माने विराटच्या चाहत्याला नाराज केलं नाही. त्याला आपल्या जवळ येऊ दिलं . पण काही क्षणात सुरक्षारक्षक त्याच्या जवळ पोहोचले आणि त्याला बाहेर खेचत नेलं. ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hyderabad loves Rohit Sharma ❤️💥 #INDvENG pic.twitter.com/ZPncpSA05W
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) January 25, 2024
A fan touched Rohit Sharma feet . Looks like he was cricket fan not member of fan club. He was wearing Virat Kohli jersey and Touched Rohit Sharma feet. That's what Rohit Sharma and Virat Kohli have earned in their life. #INDvsENG #INDvENG pic.twitter.com/vAeGLHuvEZ
— Satya Prakash (@Satya_Prakash08) January 25, 2024
विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्याने बीसीसीआयला कौटुंबिक कारण असल्याचं सांगितलं आहे. तसेच बीसीसीआनेही त्याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यात खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.