IND vs ENG | 22 वर्षाच्या पोराचं नशीब रोहित शर्माच्या हातात, प्लेइंग 11 मध्ये रोहित देणार का संधी?
ENG vs IND : टीम इंडिया आणि इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या सामन्यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा 22 वर्षाच्या पोराला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण आहे तो युवा खेळाडू जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका उद्यापासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये किंग विराट कोहली खेळणार नाही. प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्य कोच राहुल द्रविडने या मालिकेमध्ये के. एल. राहुल हा फक्त फलंदाज म्हणून खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या कसोटीमध्ये विकेटकीपर म्हणून दोन युवा खेळाडूंपैकी एकाची निवड होणार हे निश्चित मानलं जात आहे. कोण आहेत ते दोन युवा खेळाडू जाणून घ्या.
कॅप्टन रोहित कोणाला देणार संधी?
के. एल. राहुल विकेटकीपर नसल्यामुळे ध्रुव जुरेल आणि केएस भरत या दोघांपैकी एकाची निवड होणार आहे. राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेत या दोन्ही खेळाडूंपैकी एकालाच संधी खेळवणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट कोणाची निवड करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यंदा संघात सर्वांसाठी धक्कादायक म्हणजे 22 वर्षीय ध्रुव जुरेल याची निवड झाली. उत्तर प्रदेशकडून अंडर-14 आणि अंडर-16 वयोगटातून क्रिकेट खेळलं आहे. अंडर-19 वर्ल्ड कप संघातही त्याची निवड झाल होती. 2022 साली ध्रुव जुरेल याने उत्तर प्रदेशकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 790 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
दरम्यान, टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहाे. पाहुणा इंग्लंड संघ दहा वर्षांपासून भारतामध्ये मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे यंदा मालिका विजयाच्या इरादाण्यानेच इंग्लंडचा संघ मैदानात उतरेल मात्र टीम इंडियाला घरच्या मैदानावर हरवणं खायची गोष्ट नाही.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.