IND vs ENG Test : इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ स्ट्रॅटजीवर कर्णधार रोहित शर्माने दिलं रोखठोक उत्तर, स्पष्टच सांगितलं की…
इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील बेझबॉल रणनिती सर्वश्रूत आहे. या रणनितीमुळे इंग्लंडने दिग्गज संघांचं स्वप्न भंग केलं आहे. आता इंग्लंडचा संघ भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी येत आहे. त्यासाठी भारतीय संघ सज्ज असून बेझबॉल रणनितीवर रोहित शर्माने आपलं मत मांडलं आहे.
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. एका एका सामन्याच्या निकालाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणातालिकेत फरक दिसून येणार आहे. त्यात भारतात मालिका असल्याने टीम इंडियाला झुकतं माप आहे. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताला पराभूत करणं इंग्लंडला सोपं नाही. त्यामुळे इंग्लंडचा चांगलाच कस लागणार आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 5-0 ने जिंकली तर अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. दुसरीकडे, व्हाईट वॉश मिळाला तर इंग्लंडचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या मालिकेचं महत्त्व आहे. त्यात इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीचा जगभरात बोलबाला आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
पहिल्या कसोटी सामन्यांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली. त्याला इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने आपलं रोखठोक मत मांडलं. “आम्ही आमचं क्रिकेट खेळू. आम्ही आमच्या संघाला काय आवश्यक आहे याकडे लक्ष केंद्रीत करत आहोत.”
बेझबॉल रणनिती म्हणजे काय?
बेझबॉल रणनिती इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये आणली आहे. या रणनितीनुसार विकेट्सची पर्वा न करता आक्रमक खेळी केली जाते. आक्रमक खेळीमुळे विरोधी संघावर दबाब करण्याची रणनिती आहे या रणनितीने इंग्लंडने अनेक दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. बेझबॉल रणनिती इंग्लंडसाठी फायदेशीर ठरली आहे.
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया : रजत पाटिदार, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), श्रीकर भारत (विकेटकीपर), आवेश खान, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार
इंग्लंडचा संघ : बेन डुकेट, डॅन लॉरेन्स, जो रूट, ओलि पोप, झॅक क्राउले, बेन स्टोक्स (कर्णधार), रेहन अहमद, बेन फोक्स (विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), गुस एटकिन्सन, जॅक लीच, जेम्स अँडरसन, मार्क वूड, ओलि रॉबिनसन, शोएब बशीर, टॉम हार्टले