IND vs ENG | कॅप्टन रोहित शर्माला धोनीचा तो रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Rohit Sharma | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. रोहितला इंग्लंड विरुद्ध पहिल्याच सामन्यात विक्रम करण्याची संधी आहे.
हैदराबाद | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाची प्रतिक्षा आणखी लांबली. मात्र टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेनंतर आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया पहिले 2 सामने विराट कोहली याच्याशिवाय खेळणार आहे. विराटने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. पहिल्या सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र त्यानंतरही बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी फक्त 2 कडक फटक्यांची गरज आहे.
रोहित शर्मा याच्याकडे धोनीला मागे टाकायची संधी आहे. हिटमॅनकडे धोनीचा कसोटी क्रिकेटमधील सिक्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. त्यासाठी रोहितला फक्त 2 सिक्सची गरज आहे. धोनीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 90 सामन्यांमध्ये 78 सिक्स आहेत. तर रोहितने आतापर्यंत 77 सिक्स लगावले आहेत. त्यामुळे आता रोहित हे 2 सिक्स कधी लगावतो आणि धोनीला मागे टाकतो, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.