IND vs HK: आज हाँगकाँग विरुद्ध सामना, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?
भारताने आशिया कपची (Asia cup) शानदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) विजय मिळवला.
मुंबई: भारताने आशिया कपची (Asia cup) शानदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) विजय मिळवला. आशिय कप मध्ये भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुप मध्ये भारतासमोर मुख्य आव्हान पाकिस्तानच होतं. भारताने हा अडथळा पार केलाय. आता भारताचा पुढचा सामना हाँगकाँग (IND vs HK) विरुद्ध होणार आहे. क्वालिफायर गटातून हाँगकाँगने आशिया कपच्या मुख्य फेरीत प्रवेश केलाय. बुधवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना होईल.
टीम इंडिया फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होऊ शकतो
पाकिस्तानला हरवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. हाँगकाँग सारख्या तुलनेने दुबळ्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना टीम इंडिया फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करु शकते. केएल राहुल सारख्या फलंदाजाला फॉर्म मध्ये परतण्याची चांगली संधी आहे. रोहित शर्माच्या टीमसाठी हाँगकाँग विरुद्धचा सामना नेट प्रॅक्टिस पेक्षा जास्त काही नसेल. हाँगकाँगच्या संघात भारतीय आणि पाकिस्तान वंशाचे खेळाडू आहेत. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला सुपर 4 मध्ये प्रवेश मिळू शकतो.
फलंदाजीवर सर्व लक्ष
हार्दिक पंड्याच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या बळावर भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. टीम इंडियाचा फोकस आता फलंदाजीवर असेल. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दम्यान ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. टीम इंडियाची मॅनेजमेंट याच वर्ल्ड कपला डोळ्यासमोर ठेऊन विनिंग कॉम्बिनेशन बनवत आहे.
संघात काय बदल होऊ शकतात?
टीम मध्ये प्रयोग सुरु राहतील, असं कॅप्टन रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. विराट कोहलीसाठी सुद्धा फलंदाजीच्या सरावाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असेल. मागच्या सामन्यात रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्ध फारशी चमकदार कामगिरी करु शकला नव्हता. त्याला आज चांगली संधी आहे. रवींद्र जाडेजाला आज पुन्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणार? दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी देणार का? ते आज स्पष्ट होईल.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल,