IND vs NZ 1st ODI – Shubman gill च्या सेंच्युरीमुळे सर्वात जास्त दु:ख कोणाला झालं? कोणाच मन मोडलं?

IND vs NZ 1st ODI -हैदराबादमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली. गिलच हे सलग दुसर आणि एकूण तिसरं वनडे शतक आहे.

IND vs NZ 1st ODI - Shubman gill च्या सेंच्युरीमुळे सर्वात जास्त दु:ख कोणाला झालं? कोणाच मन मोडलं?
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 7:41 AM

IND vs NZ 1st ODI – क्रिकेट विश्वासाठीऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 चे दोन महिने महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण या काळात भारतात वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्वच टीम्सनी आतापासून तयारी सुरु केली आहे. टीम इंडियाने सुद्धा तयारी सुरु केलीय आणि वर्षाची दमदार सुरुवात झालीय. खासकरुन शुभमन गिल वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच महत्त्वाच अस्त्र ठरु शकतो. शुभमन गिल हळूहळू टीम इंडियात ओपनर म्हणून आपलं स्थान पक्क करतोय. वनडे वर्ल्ड कपसाठी ओपनर म्हणून शुभमन गिलच नाव पक्क झालं, तर नक्कीच दुसऱ्या कोणाच तरी मन मोडणार.

धवन-विराटचा रेकॉर्ड मोडला

बुधवारी 18 जानेवारीला हैदराबादमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली. गिलच हे सलग दुसर आणि एकूण तिसरं वनडे शतक आहे. गिलने या शतकासह विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांचा (24 इनिंग) वेगवान 1000 वनडे धावा करण्याचा भारतीय रेकॉर्ड मोडला.

गिलमुळे त्याच्या स्वप्नांचा चुराडा

शुभमन गिल फक्त शिखर धवनचा रेकॉर्ड मोडत नाहीय, तर आपल्या प्रत्येक इनिंगनंतर धवनच्या अपेक्षा, स्वप्नांचा चुराडा करतोय. शिखर धवनची मायदेशात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा आहे. करिअरमधील शेवटचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी टीममध्ये स्थान मिळवण्याच त्याच स्वप्न आहे. पण गिलच्या दमदार परफॉर्मन्समुळे या स्वप्नांना सुरुंग लागतोय. दोन सेंच्युरी आणि अर्धशतकांमुळे शुभमन गिलने ओपनर म्हणून टीम इंडियात आपलं स्थान जवळपास पक्क केलय.

बांग्लादेश वनडे सीरीजमधून ड्रॉप

मागच्या एक दशकपासून शिखर धवन कॅप्टन रोहित शर्मासोबत वनडेमध्ये डावाची सुरुवात करायचा. या जोडीने अनेक सामन्यांमध्ये दमदार सलामी दिली आहे. पण मागच्यावर्षी बांग्लादेश विरुद्धच्या वनडे सीरीजआधी शिखर धवनला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. धवनसाठी मागचं वर्ष खूपच खराब होतं. मागच्यावर्षी शिखर धवन फक्त धावा करण्यातच कमी पडला नाही, तर ज्या धावा केल्या त्यांचा वेगही फार कमी होता.

बघा गिलचा किती दमदार परफॉर्मन्स आहे

शिखर धवनने 2022 साली 22 इनिंगमध्ये 34 च्या सरासरीने आणि 74 च्या स्ट्राइक रेटने फक्त 688 धावा केल्या आहेत. त्या तुलनेत गिलने जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान 16 इनिंगमध्ये 70 च्या सरासरीने 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 100 च्या वर होता. त्याच्यासमोर गिल पुढे निघून गेला

2019 मध्ये शुभमन गिलने वनडे डेब्यु केला. मागच्या 6 महिन्यात टीमसाठी आपण किती महत्त्वाचे आहोत, ते गिलने सिद्ध केलय. योगायोगाने काही वनडे सीरीजमध्ये गिलने धवनसोबत ओपनिंगही केली. या सीरीजमधल्या परफॉर्मन्समुळे एकाबाजूला शिखर धवनच टीममधील स्थान धोक्यात येत होतं, त्याचवेळी गिलने त्याच्यासमोर टीममधील आपल स्थान पक्क केलं. धवनसोबत ओपनिंग करताना गिलने झिम्बाब्वे दौऱ्यावर वनडे करिअरमधील आपलं पहिलं शतक झळकावलं. वेस्ट इंडिज विरुद्ध एका मॅचमध्ये तो 98 रन्सवर आऊट झाला होता.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.