INDvsNZ : विराट कोहली याच्यानंतर आणखी एका फलंदाजाचं सलग दुसरं शतक

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय सामन्यात सलग 2 शतक ठोकले होते. त्यानंतर आता टीम इंडियाच्या सलामी फलंदाजाने सलग शतक करण्याचा कारनामा केलाय.

INDvsNZ : विराट कोहली याच्यानंतर आणखी एका फलंदाजाचं सलग दुसरं शतक
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 5:06 PM

हैदराबाद : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हैदराबादमधील पहिल्या वनडे सामन्यात सलामी फलंदाजाने धमाका केलाय. विराट कोहली याच्यानंतर आता या युवा बॅट्समनने सलग दुसरं एकदिवसीय शतक ठोकण्याचा कारनामा केलाय. या सलग दुसऱ्या शतकासह या फलंदाजाने आगामी वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी सिद्ध केलीय. तसेच विवाहासाठी विश्रांती घेतलेल्या केएल राहुलची जागा धोक्यात आलीय.

टीम इंडियाचा सलामी फलंदाज शुबमन गिल याने विराटप्रमाणे सलग दुसरं शतक ठोकलं आहे. शुबमनने श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध सेंच्युरी ठोकत टीम इंडियाला सावरलं.

हे सुद्धा वाचा

शुबमन गिलचं शानदार शतक

शुबमनने अवघ्या 87 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. शुबमनने याआधी श्रीलंका विरुद्ध तिरुवअनंतपूरममध्ये श्रीलंका विरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात 116 धावांची खेळी केली होती.

विराटचा धमाका

विराटने याआधी बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडेतही 113 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 113 धावांची शतकी खेळी केली होती. विराटचं हे सलग दुसरं एकदिवसीय शतक ठरलं होतं.

विराटने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बरोबर 10 डिसेंबरला शतकी खेळी केली होती. विराटने तेव्हा 91 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्ससह 113 रन्स केल्या होत्या. हा सामना चिटगावमध्ये खेळवण्यात आला होता. तर त्यानंतर श्रीलंका विरुद्ध 87 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 सिक्ससह 113 रन्स केल्या.

1 हजारी शुबमन

दरम्यान शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या या पहिल्याच सामन्यात 33 व्या ओव्हरमध्ये मोठा कीर्तीमान केला. शुबमनने ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चौका ठोकला. शुबमनने यासह 1 हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण केला.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन

फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (कप्तान), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिचेल सैंटनर, लॉकी फर्ग्यूसन, शिप्ले आणि टिकनर.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.