INDvsNZ, 1st ODI : मायकेल ब्रेसवेल याची शतकी झुंज, टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 12 धावांनी विजय

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यानंतरही सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीवर सवाल उपस्थित झालेत.

INDvsNZ, 1st ODI : मायकेल ब्रेसवेल याची शतकी झुंज, टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 12 धावांनी विजय
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 10:06 PM

हैदराबाद : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने झटपट विकेट्स गमावल्यानंतर मायकेल ब्रेसवेल अखेरपर्यंत भिडला. मात्र हातातोंडाशी आलेला घास टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हिसकावून घेतला. ब्रेसवेलने अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र अखेर टीम इंडियाचाच विजय झाला. न्यूझीलंडचा डाव 49.2 ओव्हरमध्ये 337 धावावंर आटोपला. दरम्यान 350 धावा करुनही सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेल्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

न्यूझीलंडने सुरुवातीला ठराविक अंतराने विकेट्स गमावले. त्यामुळे न्यूझीलंडची 6 बाद 131 अशी स्थिती झाली. मात्र त्यांनंतर सॅंटनर आणि ब्रेसवेलने 7 व्या विकेट्ससाठी 162 धावा जोडल्या. ब्रेसवेलने आणि मिचेल सॅंटनर या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची पिसं काढली. यानंतर सँटनर आऊट झाला. तसेच दुसऱ्या बाजूला विकेट्स जात होते. मात्र ब्रेसवेल खिंड लढवत होता. मात्र ब्रेसवेलच्या रुपात न्यूझीलंडने 10 विकेट गमावली आणि टीम इंडियाचा विजय झाला.

शेवटपर्यंत मैदानात राहून ब्रेसवलला न्यूझीलंडला विजयी करता आलं नाही. मात्र त्याने एकतर्फी झुंज देत न्यूझीलंडला सामन्यात शेवटपर्यंत जिवंत ठेवलं. न्यूझीलंडकडून ब्रेसवेलने 78 बॉलमध्ये सर्वाधिक 140 धावा केल्या. तर त्या खालोखाल सँटनरने 57 धावा जोडल्या. फिन एलेनने 40 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन टॉम लॅथमने 24 रन्स केल्या. तर त्या व्यतिरिक्त इतर फलंदाज हे स्वस्तात माघारी परतले.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून शुबमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीत 19 चौकार आणि 9 गगनचुंबी सिक्स ठोकलं.

शुबमनशिवाय टीम इंडियाच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादव याने 31, हार्दिक पांड्या याने 28 तर वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन

फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (कॅप्टन), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिचेल सैंटनर, लॉकी फर्ग्यूसन, शिप्ले आणि टिकनर.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.