IND vs NZ Toss : दुसऱ्या दिवशी टॉस, टीम इंडियाची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल
India vs New Zealand 2nd Test Day 2 Toss: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ हा पावसामुळे वाया गेला. जोरदार पावसामुळे बीसीसीआयने पहिल्या दिवसाचा खेळ हा रद्द करण्याचा निर्णय केला. मात्र त्यानंतर अखेर दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने सामना होण्याची चिन्हं आहेत. सामन्याला सुधारित वेळेनुसार सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजाचा निर्णय घेत न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडियात 2 बदल
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. आकाश दीप याच्या जागी कुलदीप यादव याला संधी दिली गेली आहे. स्टार ओपनर शुबमन गिल याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. शुबमनला मानेच्या दुखापतीमुळे या सामन्यापासून दूर रहावं लागलं आहे.बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. शुबमन गिल याच्या जागी मुंबईकर सर्फराज खान याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 मुंबईकर आहेत. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचाही समावेश आहे.
सत्रनिहाय वेळ
दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळाला नियोजित वेळेच्या 15 मिनिटांआधी सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने आपण दिवसाच्या खेळातील तिन्ही सत्रांची वेळ जाणून घेऊयात.
पहिलं सत्र, सकाळी 9.15 ते 11.30 पर्यंत
दुसरं सत्र, दुपारी 12.10 ते 2. 25 पर्यंत
तिसरं सत्र, दुपारी 2.45 ते 4.45 पर्यंत
टीम इंडियाचा बॅटिंगचा निर्णय
🚨 Toss 🚨
Captain @ImRo45 wins the toss and #TeamIndia elect to bat in the 1st Test 👌👌
Match Updates ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ovQuU2WLvE
— BCCI (@BCCI) October 17, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.