Rohit Sharma : रोहित शर्मा याचा फॅन थेट मैदानात घुसला, हिटमॅनने नक्की काय केलं?
आपल्या आवडत्या खेळाडूला आयुष्यात एकदातरी जवळून पाहता यावं, अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. मात्र ती इच्छा प्रत्येकाची पूर्ण होतेच असं नाही.
रायपूर : टीम इंडियाने न्यूझीलंडवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 109 धावांचं आव्हान टीम इंडियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 20.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहित न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोपत होता. यादरम्यान मैदानात रोहितचा छोटा चाहता सुरक्षा भेदून मैदानात आला. हा सर्व व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नक्की काय झालं?
टीम इंडियाच्या डावातील 10 वी ओव्हर सुरु होती. ओव्हरमधील 4 बॉल टाकून झाले होते. रोहित 37 धावांवर नाबाद खेळत होता. या दरम्यान काही समजण्याच्या आत रोहितचा छोटा चाहता रोहितच्या दिशेने धावत आला. रोहितला कच्चून मीठी मारली. मात्र सुरक्षारक्षकांनी त्या छोट्या चाहत्याला हटकलं. मात्र रोहितने सेक्युरिटीला त्याला काही करु नका, असं इशारा केला. रोहितने या कृतीतून आपला मनाचा मोठेपणा दाखवून दिला.
रोहितच्या या कृतीचं सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक होत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला आयुष्यात एकदातरी जवळून पाहता यावं, अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. मात्र ती इच्छा प्रत्येकाची पूर्ण होतेच असं नाही. मग चाहते सामन्यादरम्यान सिक्युरिटीला चकवा देत मैदानात घुसतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात.
रोहित शर्मा आणि त्याचा चाहता
Rohit Sharma fan on ground@ImRo45 #Cricket #RohitSharma #BCCI pic.twitter.com/hMsAOsRQ5U
— Atulraj 45 (@Atul_Ro45) January 21, 2023
आतापर्यंत अनेकदा असे प्रकार घडले आहेत. यानंतर सुरक्षारक्षक मैदानात येऊन त्या व्यक्तिला बाहेर घेऊन जातात. अनेकदा घुसखोरी करणाऱ्या अशा चाहत्यांविरोधात गुन्हाही दाखल केला जातो. मात्र या छोट्या चाहत्याला काही करु नका, अशी ताकीदच रोहितने दिली.
दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना हा इंदूरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा हा तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), फिन एलन, डेवन कॉन्वे, हेनरी निकोल्स, डेरले मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅंटनर, हेनरी शिप्ले, लॉकी फर्ग्यूसन आणि ब्लेयर टिकनेर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.