IND vs NZ ODI Series- टीम इंडियाने एका विजयात न्यूझीलंडला दिले 3 धक्के, किवींनी मानाच स्थान गमावलं
IND vs NZ ODI Series- भारताने टीम इंडियावर खूपच आरामात विजय मिळवला. हा पराभव न्यूझीलंडच्या खूपच जिव्हारी लागणारा आहे. कारण टीम इंडियाने एका विजयात न्यूझीलंडला 3 धक्के दिले.
रायपूर – टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये काल रायपूर येथे दुसरा वनडे सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडला 108 धावांवर रोखलं, नंतर 8 विकेट राखून विजय मिळवला. भारताने टीम इंडियावर खूपच आरामात विजय मिळवला. हा पराभव न्यूझीलंडच्या खूपच जिव्हारी लागणारा आहे. कारण टीम इंडियाने एका विजयात न्यूझीलंडला 3 धक्के दिले. न्यूझीलंडने सामना गमावलाच. पण त्याचबरोबर सीरीजही हातातून गेली. त्यानंतर आता नंबर वनच स्थानही गमावलय. भारताकडे 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी आहे. भारताकडून दुसऱ्या सामन्यात लज्जास्पद पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडला आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.
भारतामुळे इंग्लंडचाही फायदा
न्यूझीलंडला मानाच नंबर 1 स्थान गमवाव लागलय. दुसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या टीमने मिळवलेल्या विजयामुळे भारतासोबत इंग्लंडचाही फायदा झालाय. रायपूर वनडेत पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडची टीम आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर गेलीय.
There’s a new #1 ranked team in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Team Rankings following India’s win against New Zealand ?https://t.co/mSKvaXhFzx
— ICC (@ICC) January 22, 2023
इंग्लंडचा फायदा कसा झाला ते समजून घ्या
आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडची टीम नंबर 1 स्थानावर पोहोचलीय. न्यूझीलंडच्या टीमला हैदराबाद येथील पहिल्या वनडेतही टीम इंडियाने पराभूत केलं होतं. न्यूझीलंडने सीरीजही गमावलीय. भारताने दुसरी वनडे जिंकल्यानंतर रँकिंगमध्ये टीम इंडिया चौथ्यावरुन तिसऱ्या स्थानावर पोहचलीय. मॅचच्या आधी न्यूझीलंडचे 115 रेटिंग पॉइंटस होते. इंग्लंडची टीम 113 पॉइंटससह दुसऱ्या स्थानावर होती. ऑस्ट्रेलिया 112 पॉइंट्ससह तिसऱ्या आणि टीम इंडिया 111 पॉइंट्ससह चौथ्या नंबरवर होती. टॉप 3 टीम्स समान पॉइंट्स
भारताकडून 8 विकेटने पराभव झाल्यानंतर न्यूझीलंड टीमची 113 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. त्यांचे ओव्हरऑल 3166 पॉइंट्स आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारत तिघांचे समान रेटिंग पॉइंट आहेत. टीम इंडियाकडे नंबर वन पदावर काबीज होण्याची संधी आहे. भारताने न्यूझीलंडला तिसऱ्या वनडे सामन्यात हरवलं, तर ते नंबर एक पदावर पोहोचतील. भारताकडे जवळपास 4 वर्षानंतर वनडेमध्ये नंबर 1 बनण्याची संधी आहे.