Video : शमी आणि हार्दिक याचा जबरदस्त कॅच, एकदा व्हीडिओ बघाच

मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या या दोघांनी घेतलेला कॅचेस जवळपास सारख्याच होत्या. या कॅचला कॉपी पेस्ट अर्थात शेम टु शेम असंही म्हटलं जात आहे.

Video : शमी आणि हार्दिक याचा जबरदस्त कॅच, एकदा व्हीडिओ बघाच
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 5:00 PM

रायपूर : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या वनडेत सामन्यात न्यूझीलंडची दाणादाण उडवली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा अवघ्या 108 धावांवर बाजार उठला. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून न्यूझीलंडला बँटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन रोहितचा फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरवला. टीम इंडियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. या सहाच्या सहा गोलंदाजांनी किमान 1 विकेट घेतलीच. मात्र या दरम्यान चर्चा झाली ती मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या या दोघांनी घेतलेल्या कॅचची. या दोघांनी आपल्या बॉलिंगवर जबरदस्त कॅच घेतला. बीसीसीआयने ट्विटरवर हा व्हीडिओ शेअरही केला आहे.

आपल्याच बॉलिंगवर कॅच घेणं तसं कठीणच. कारण बॉल टाकल्यानंतर गोलंदाजाचा वेग कमी होतो. मात्र तितक्यात समोरुन कॅच येते. तो कॅच घेण्यासाठी गोलंदाजाचं बॉलकडे लक्ष असणं गरजेचं असतं. त्यापलीकडे कॅच घेण्यासाठी काही सेकंदांचाच वेळ असतो. अवघ्या काही सेकंदात हे सर्व घडतं. इतक्या कमी वेळेतच बॉलरला सर्व कार्यक्रम आटोपावा लागतो. तसंच शमी आणि हार्दिकने केलं.

हार्दिक न्यूझीलंडच्या डावातील 7 वी ओव्हर शमीने टाकली. या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर शमीने डेरल मिचेलला स्वत:च्या बॉलिंगवर कॅच आऊट केलं. मिचेल 1 रन करुन माघारी परतला. त्यानंतर वेळ होती ती डेव्हॉन कॉनव्हेची. हार्दिक 10 वी ओव्हर टाकायला आला. हार्दिकने ओव्हरमधील 4 बॉलवर कॉनव्हेचा जबरदस्त एकहाती कॅच पकडला.

हे सुद्धा वाचा

कॉनव्हेने 7 धावा केल्या. शमी आणि पांड्या या दोघांनी घेतलेल्या कॅच जवळपास सारख्याच होत्या. या कॅचला कॉपी पेस्ट अर्थात शेम टु शेम असंही म्हटलं जात आहे.

दरम्यान भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांना टिकता आलं नाही. टीम इंडियाकडून शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), फिन एलन, डेवन कॉन्वे, हेनरी निकोल्स, डेरले मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅंटनर, हेनरी शिप्ले, लॉकी फर्ग्यूसन आणि ब्लेयर टिकनेर.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.