IND vs NZ: शानदार विजयानंतर हार्दिक पंड्याची टीम इंडियाकडे ‘ही’ खास डिमांड
IND vs NZ: हार्दिक पंड्याची जी डिमांड आहे, त्यातून तो कसा वेगळा विचार करतो ते दिसतं.

माऊंट माऊंगानुई: T20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियात बदल घडवण्याची चर्चा सुरु आहे. टीमच्या नेतृत्वासह खेळाडू बदलण्याची मागणी होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील अपयशानंतर हार्दिक पंड्याला टी 20 मध्ये कामयस्वरुपी कॅप्टन बनवण्याची मागणी होत आहे. सध्या हार्दिक न्यूझीलंडमध्ये टी 20 मालिकेत टीमच नेतृत्व करतोय. भारताने आज दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला.
पार्ट टाइम ऑफ स्पिनरच महत्त्वपूर्ण योगदान
माऊंट माऊंगानुई येथे भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीजमधला दुसरा सामना खेळला गेला. सूर्यकुमार यादवने या मॅचमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने टी 20 करीयरमधील दुसरं शतक झळकावलं. टीम इंडियाने न्यूझीलंडला 126 रन्सवर ऑलआऊट करुन 65 रन्सनी मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात पार्ट टाइम ऑफ स्पिनर दीपक हुड्डाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 विकेट काढल्या.
बॅट्समनकडून फलंदाजी व्यतिरिक्त काय अपेक्षा?
टीमचा हा विजय आणि पार्ट टाइम गोलंदाजांबद्दल हार्दिक पंड्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी बोलला. टीममधले अन्य बॅट्समन सुद्धा गोलंदाजीत योगदान देतील, अशी अपेक्षा आहे, असं हार्दिक म्हणाला.
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
“मैदान ओलं होतं. त्यामुळे गोलंदाजांना विजयाच श्रेय जातं. मी भरपूर गोलंदाजी केलीय. येणाऱ्या दिवसात गोलंदाजीत जास्त पर्याय पहाण्याची इच्छा आहे. हे नेहमीच कामाला येईल असं नाही, पण जास्तीत जास्त फलंदाजांनी चेंडूने सुद्धा योगदान द्यावे ही अपेक्षा आहे” असं हार्दिक म्हणाला.
टीम इंडियाला कमतरता जाणवलीय
भारतीय टीमच्या टॉप ऑर्डरमध्ये कॅप्टन रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर आहेत. यापैकी कोणीही गोलंदाजी करत नाही. क्रिकेट एक्स्पर्ट्सनी टीम इंडियाच्या याच कमतरतेवर भाष्य केलय. टीका केलीय. मोठ्या टुर्नामेंट्समध्ये टीम इंडियाला याचा फटका सुद्धा बसलाय.
वर्ल्ड कपमध्ये दीपक हुड्डाला का गोलंदाजी दिली नाही?
टीम इंडियाकडे दीपक हुड्डाच्या रुपात पर्याय आहे. जो फलंदाजी बरोबर उपयुक्त गोलंदाजी सुद्धा करु शकतो. टीम इंडियाने आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये हुड्डाला संधी दिली. पण त्याच्याकडून गोलंदाजी करुन घेतली नाही. फलंदाजीत सुद्धा त्याला लोअर ऑर्डरमध्ये ठेवलं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.