IND vs NZ : पुणे कसोटीआधी टीमला धक्का, माजी कर्णधार सामन्यातून ‘आऊट’

India vs New Zealand 2nd Test : इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार याला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं आहे.

IND vs NZ : पुणे कसोटीआधी टीमला धक्का, माजी कर्णधार सामन्यातून 'आऊट'
virat kohli and kane williamsonImage Credit source: rcb website
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 6:52 PM

न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेची अप्रतिम सुरुवात केली. टीम इंडियाला बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 8 विकेट्सने पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. न्यूझीलंडने भारतात 1988 नंतर हा पहिला तर एकूण तिसरा कसोटी विजय मिळवला. आता उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक सामना हा 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड टीमला मोठा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन याला दुसऱ्या कसोटीतही खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केनला दुखापतीमुळे पुणे कसोटीतून माघार घ्यावी लागल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन दिली आहे.

केनला मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. न्यूझीलंड टीम भारत दौऱ्यावर येण्याआधी श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. केनला या दौऱ्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून केन या दुखापतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. केन टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडसोबत भारतात आला नव्हता. त्यामुळे केन दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता केन पुणे कसोटीतही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

गॅरी स्टेड काय म्हणाले?

आम्ही केनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. मात्र केन पूर्णपणे फिट नाही. केन येत्या काही दिवसात या दुखापतीतून बरा होईल आणि तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी तो उपलब्ध असेल, अशा आशावाद न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले.

केन विलियमसन दुखापतीमुळे ‘आऊट’

दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.

दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.