IND vs NZ : मॅच हरल्याची खंत नाही, न्यूझीलंडचा एक खेळाडू खूप पॉझिटिव्ह गोष्ट बोलला

IND vs NZ : न्यूझीलंडचा स्पिनर मायकल ब्रेसवेल याची मात्र अशी कुठलीही तक्रार नाहीय. लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर स्पिनला अनुकूल खेळपट्टीवर न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाला.

IND vs NZ : मॅच हरल्याची खंत नाही, न्यूझीलंडचा एक खेळाडू खूप पॉझिटिव्ह गोष्ट बोलला
ind vs nz 1st t20Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 10:57 AM

India vs New Zealand 2nd T20 : भारतीय टीमने दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडला 6 विकेटने पराभूत केलं. या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी जबरदस्त गोलंदाजी केली. भारत दौऱ्यावर येणाऱ्या टीम्स अनेकदा तक्रारी करतात. स्पिनला अनुकूल विकेटवर जेव्हा या टीम्स खेळतात, तेव्हा ते अशाप्रकारचे पीच क्रिकेटसाठी धोकादायक, खराब असल्याच सांगतात. न्यूझीलंडचा स्पिनर मायकल ब्रेसवेल याची मात्र अशी कुठलीही तक्रार नाहीय. लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर स्पिनला अनुकूल खेळपट्टीवर न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाला. ब्रेसवेलची त्या संदर्भात कुठलीही तक्रार नाहीय.

ब्रेसवेलच वक्तव्य

“तुम्हाला T20 क्रिकेट खेळायला आवडेल, अशी ही विकेट नाहीय. पण काहीवेळा गोष्टी शिकण्यासाठी, कौशल्य वाढवण्यासाठी अशा रोमांचक संधीची गरज असते. मला नेहमीच अशा विकेटवर खेळायला आवडणार नाही. अशा मॅचेसमधून मी धडा शिकलोय” असं मायकल ब्रेसवेल म्हणाला.

आम्ही तक्रार करु शकत नाही

“आम्ही तक्रार करु शकत नाही. अशा वेगवेगळ्या विकेट्सवर कशा पद्धतीने खेळायच, ते शोधणं खूप रोमांचक आहे. तुम्ही नेहमीच सपाट विकेटवर खेळत राहिलात, तर तुम्हाला तुमच्या कौशल्याची परीक्षा घेता येणार नाही. जगभरातील वेगळ्या प्रकारच्या विकेट्स ही सकारात्मक बाब आहे” असं ब्रेसवेल म्हणाला. लखनौच्या विकेटवर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम्सच्या स्पिनर्सनी जबरदस्त गोलंदाजी केली. टीम इंडियाचा विजयासाठी संघर्ष

लखनौच्या पीचवर न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 99 धावा केल्या. या विकेटवर चेंडू खूप टर्न होत होता. टीम इंडियासाठी हे लक्ष्य खूप सोप वाटत होतं. पण असं झालं नाही. टीम इंडियाने सुद्धा विजय मिळवण्यासाठी संघर्ष केला. न्यूझीलंडने टीम इंडियावर दबाव आणण्यासाठी 5 स्पिनर्स वापरले. भारताने एक चेंडू बाकी असताना 6 विकेट राखून विजय मिळवला. या मॅचनंतर अनेकांनी विकेटबद्दल तक्रार केलीय. ही विकेट टी 20 क्रिकेटला साजेशी नव्हती. कारण दोन्ही इनिंगमध्ये मिळून या विकेटवर फक्त 200 धावा केल्या. भारतात अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. या विकेटकडून भारतीय बॉलर्सना मदत मिळाली. पण न्यूझीलंड टीमने सुद्धा तोडीची गोलंदाजी केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.