IND vs NZ 1st ODI Rohit Sharma च्या कॅप्टनशिपमध्ये विराट जास्त धोकादायक, सेहवाग-पॉन्टिंगच्या रेकॉर्डच खरं नाही
IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाच्या निशाण्यावर आता न्यूझीलंड आहे. श्रीलंकेप्रमाणे हा अडथळा पार करायचा असेल, तर विराट कोहलीला पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवावा लागेल. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये विराटने धावांचा पाऊस पाडला.
IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाच्या निशाण्यावर आता न्यूझीलंड आहे. श्रीलंकेप्रमाणे हा अडथळा पार करायचा असेल, तर विराट कोहलीला पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवावा लागेल. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये विराटने धावांचा पाऊस पाडला. आता न्यूझीलंड विरुद्ध त्याला तसाच खेळ दाखवावा लागेल. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये विराट कोहली टॉप स्कोरर होता. तोच फॉर्म त्याने न्यूझीलंड विरुद्ध कायम ठेवला, तर दोन गोष्टी घडतील. एक म्हणजे भारताचा विजय पक्का होईल. दुसरीकडे विरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड मोडला जाईल.
न्यूझीलंड विरुद्ध किती शतक झळकावली?
न्यूझीलंड विरुद्ध विरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉन्टिंगच्या नावावर सर्वाधिक 6 शतकं झळकवण्याचा रेकॉर्ड आहे. नुकतच विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 व शतक झळकावलं. विराटने न्यूझीलंड विरुद्ध 5 शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये विराटने दोन शतकं ठोकली, तर सेहवाग आणि पॉन्टिंगचा रेकॉर्ड मोडला जाईल. एका शतकामुळेही बरोबरी साधली जाईल.
रोहितच्या नेतृत्वाखाली विराट जास्त धोकादायक?
सेहवाग आणि पॉन्टिंगचा रेकॉर्ड विराट कोहलीकडून मोडला जाऊ शकतो. कारण सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना विराट कोहली जास्त धोकादायक असतो. विराट धोनी आणि स्वत:च्या नेतृत्वाखाली जास्त वनडे सामने खेळला आहे. पण रोहितच्या नेतृत्वाखाली विराटची सरासरी जास्त आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली विराटने 114.83 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्ध सीरीजमध्ये किती धावा केल्या?
विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध नेहमीच सरस खेळ केला आहे. त्यामुळे तो पॉन्टिंग आणि सेहवागचा रेकॉर्ड मोडू शकतो. मागच्या सीरीजमध्ये विराट कोहली टॉप स्कोरर होता. त्याने 87.66 च्या सरासरीने 263 धावा केल्या.
विराटच्या नावावर एकूण 74 शतकं
विराटने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात गुवाहाटीत 113 धावा केल्या. तिरुवअनंतपूरममध्ये नाबाद 166 धावा केल्या. हे शतक विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 74 वं, वनडेतील 46 वं तर भारतातील 21 वं वनडे शतक ठरलं. पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज