AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuzvendra Chahal – धनश्री वर्मा नाही, चहलने ‘या’ मुलीला बनवलं ट्रॅव्हल पार्ट्नर, जाणून घ्या कोण आहे ती मुलगी?

Yuzvendra Chahal - युजवेंद्र चहलने इंदोरला जाताना इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीचा फोटो शेअर केलाय. ती मुलगी आपली ट्रॅव्हल पार्ट्नर असल्याच चहलने सांगितलय. भारतीय टीम न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारीला तिसरा वनडे सामना खेळणार आहे.

Yuzvendra Chahal - धनश्री वर्मा नाही, चहलने 'या' मुलीला बनवलं ट्रॅव्हल पार्ट्नर, जाणून घ्या कोण आहे ती मुलगी?
Yuzvendra chahalImage Credit source: instagram
| Updated on: Jan 23, 2023 | 12:56 PM
Share

Yuzvendra Chahal Bowling – .युजवेंद्र चहलचा टीम इंडियाच्या सुपरस्टार खेळाडूंमध्ये समावेश होतो. चहल त्याच्या पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असतो. चहलची बायको धनश्री वर्मा सोशल मीडियावर भरपूर Active आहे. तिने शेअर केलेले फोटो, व्हिडिओ चाहते आवर्जुन पाहतात. चहल सध्या टीम इंडियाचा भाग आहे. न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये खेळत आहे. चहल सुद्धा बायकोप्रमाणेच सोशल मीडियावर बराच Active आहे. तो सुद्धा सोशल मीडियावरुन चाहत्यांना सतत अपडेट देत असतो. त्याने टीम इंडियासोबत इंदोरला जातानाचा एक फोटो पोस्ट केलाय. फोटोमधली मुलगी आपली ट्रॅव्हलिंग पार्ट्नर असल्याच चहलने सांगितलय. सर्वानाच प्रश्न पडलाय, चहलने पोस्ट केलेल्या फोटोमधली मुलगी कोण आहे?

चहलने शेअर केला फोटो

टीम इंडियाचा तिसरा वनडे सामना इंदोरमध्ये होणार आहे. युजवेंद्र चहलने शेअर केलेला फोटो कुठल्या मुलीचा नाहीय. तो कुलदीप यादवचा फोटो आहे. चहलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलाय. चहलने खूप चालाकीने फिल्टरचा उपयोग करुन कुलदीपला एका महिलेच रुप दिलय. फोटोमध्ये त्याने ट्रॅव्हल पार्ट्नर म्हणून कॅप्शनही दिलय. सोशल मीडियावर फोटो पाहून फॅन्सही गोंधळून गेले. पण हा सर्व प्रकार नंतर लक्षात आलां.

कधी लग्न केलं?

युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबत वर्ष 2020 मध्ये लग्न केलं. दोघांची ऑनलाइन डान्स क्लासमध्ये भेट झाली होती. धनश्री पेशाने कोरिओग्राफर आणि डेंटिस्ट आहे. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. वनडे आणि टी 20 मध्ये चहलने किती विकेट घेतल्या?

युजवेंद्र चहलने वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियासाठी जबरदस्त प्रदर्शन केलय. त्याने आपल्या बळावर टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय. युजवेंद्र चहल फॉर्ममध्ये असताना कुठल्याही बॅटिंग ऑर्डरची वाट लावू शकतो. त्याने भारतासाठी 71 वनडे सामन्यात 119 विकेट आणि 74 टी 20 सामन्यात 90 विकेट घेतल्यात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.