IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया प्लेईंग निश्चित!

India Playing 11 Against Pakistan Icc World Cup 2023 | टीम इंडिया पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. वर्ल्ड कपमधील मोठ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असेल?

IND vs PAK | पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया प्लेईंग निश्चित!
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 4:24 PM

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात मोठा सामना हा 14 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी या सामन्यात आमनेसामने असणार आहे. हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानने आतापर्यंत वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी तयार आहे. पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी देऊ शकते, हे आपण पाहुयात.

टॉप ऑर्डर

डेंग्युनंतर टीम इंडियात शुबमन गिल याची एन्ट्री होऊ शकते. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघे ओपनिंग करतील. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत ईशान किशन याला दोन सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र शुबमनच्या कमबॅकमुळे ईशानला बाहेर बसावं लागू शकतं. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येईल.

चौथ्या स्थानी मुंबईकर श्रेयस अय्यर बॅटिंगसाठी येऊ शकतो. श्रेयस अय्यर याच्यावर मोठी जबाबदारी असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिरोवर आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध केलेल्या खेळीमुळे श्रेयसचा विश्वास नक्कीच वाढलेला असेल. श्रेयसला स्वत:ला सिद्ध करुन चमकण्याची ही सुवर्णसंधी असेल. तसेच पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल खेळेल.

उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा या दोघांकडून बॅटिंगसह बॉलिंगची दुहेरी जबाबदारी असणार आहे. या दोघांवर टीम इंडियाला फिनिशिंग टच देण्यासह पाकिस्तानला रोखण्याचं आव्हान असणार आहे. तसेच कुलदीप यादव याला स्पिनर म्हणून संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे.

टीम इंडियाचा भेदक मारा

तर दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तिघांचा भेदक मारा करुन पाकड्यांना झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.