IND vs PAK Playing 11 : टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन लीक? BCCIने शेअर केले 11 खेळाडूंचे फोटो

आशिया कपच्या भारतीय संघात दीपक हुडा, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात बाबर आझमच्या संघाविरुद्ध करणार आहे. वाचा...

IND vs PAK Playing 11 : टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन लीक? BCCIने शेअर केले 11 खेळाडूंचे फोटो
टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन लीक?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 5:32 PM

नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup 2022) सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 28 ऑगस्टला म्हणजेच रविवारी होणार आहे. जसजसा वेळ जात आहे. तसतशी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, बीसीसीआयनं (BCCI) भारतीय खेळाडूंचा सराव करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यानंतर बोर्डानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हन लीक केल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नेट सेशनचे 10 फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर हे 11 खेळाडू रविवारीही मैदानात उतरतील असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. बीसीसीआयचा पहिला फोटो केएल राहुल आणि रोहित शर्माचा आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांचा क्रमांक लागतो.

BCCIने शेअर केले 11 खेळाडूंचे फोटो

पाकिस्तानविरुद्ध भारताची मोहीम

ट्विटरवर एका युजरनं असं म्हटलंय की, ‘या फोटोंच्या माध्यमातून बीसीसीआयने प्लेइंग इलेव्हनचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी आणखी एका युजरने प्लेइंग 11 लीक झाल्याचे सांगितले. आशिया कपच्या भारतीय संघात दीपक हुडा, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात बाबर आझमच्या संघाविरुद्ध करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून गमावलेल्या 10 विकेट्सची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. अ गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया हाँगकाँगविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

BCCIचं ट्विट

हाय व्होल्टेज सामना

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी केएल राहुलने पत्रकार परिषदेत भाग घेतला आणि पाकिस्तानविरुद्धच्या या हाय-व्होल्टेज सामन्याबद्दल खुलेपणाने बोलले. या सामन्याची मी आतुरतेने वाट पाहत असल्याचे राहुलने सांगितले. तो म्हणाला की, चाहत्यांप्रमाणे तोही या सामन्यादरम्यान येणाऱ्या भावनांपासून दूर पळू शकत नाही. राहुल म्हणाला की, त्या खास दिवशी तुम्ही तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करता.

फोटो आणि बरंच काही…

बीसीसीआयनं जो फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये पहिला फोटो केएल राहुल आणि रोहित शर्माचा आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांचा क्रमांक लागतो.  त्यामुळे यावरुन प्लेइंग इलेवनचा अंदाजा लावता येऊ शकतो. यावरुन क्रिकेटप्रेमी देखील खूश झाले आहेत. तर पुढील अंदाज देखील बांधायला त्यांनी सुरुवात केली आहे.

संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दाहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.