SA vs IND : टीम इंडियाचा सलग 11 वा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी धुव्वा, मालिकेत 1-0 ने आघाडी
India vs South Africa 1st T20i Match Result : टीम इंडियाने संजू सॅमसन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी मात केली आहे. भारताचा हा सलग 11 वा टी 20i विजय ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने 4 सामन्यांच्या टी 20I मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 203 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 13बॉलआधीच गुंडाळलं. दक्षिण आफ्रिका 141 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताचा हा डरबनमधील पाचवा तर सलग 11 वा टी 20I विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची धारदार बॉलिंग
दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंचा अपवाद वदळता बहुतांश फलंदाजांचा अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी विकेटकीपर बॅट्समन हेन्रिक क्लासेन याने 25,गेराल्ड कोएत्झी 23 आणि रायन रिकेल्टन याने 21 धावांचं योगदान दिलं. तर ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि मार्को जान्सेन या तिघांना 18 पेक्षा पुढे मजल मारता आली नाही. तर इतरांनी तर प्रतिकारच केला नाही. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्थी आणि रवी बिश्नोई याने दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. आवेश खान याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अर्शदीप सिंह याने 1 विकेट घेतली.
भारताची बॅटिंग
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला नाणेफेक जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने संजू समॅसन याच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 विकेट्स गमावून 202 धावांपर्यंत मजल मारली. संजूने 10 सिक्स आणि 7 फोरसह 107 रन्स केल्या. तिलक वर्माने 33 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन सूर्यकुमार यादवने 21 धावा केल्या. रिंकु सिंहने 11 धावांची भर घातली. मात्र इतर कुणालाही काही करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळल्या.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
A clinical bowling display by #TeamIndia in Durban👌👌
South Africa all out for 141.
India win the 1st #SAvIND T20I by 61 runs and take a 1-0 lead in the series 👏👏
Scorecard – https://t.co/0NYhIHEpq0 pic.twitter.com/36MRC63RHD
— BCCI (@BCCI) November 8, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.