SA vs IND | शतकवीर सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत, हेल्थबाबत मोठी अपडेट समोर

SA vs IND : सूर्यकुमार यादव याने उत्तम कॅप्टन्सी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मात्र गडी शेवटच्या सामन्यात शतक केल्यावर फिल्डिंग करताना दुखापती झाला. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला उचलून बाहेर न्यावं लागलं.

SA vs IND | शतकवीर सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत, हेल्थबाबत मोठी अपडेट समोर
Suryakumar Yadav Health Update
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 12:20 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टी-20 मधील चौथं शतक ठोकत मोठा विक्रम रचला. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव जखमी झाला होता, त्याला चालू सामन्यातून बाहेर जावं लागलं होतं. सुर्याला टीम स्टाफमधील दोघांनी उचलून बाहेर नेलं होतं. सूर्याला आता चालता येत आहे की नाही याबाबतची माहिती समोर आली आहे.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या बॉलर्सचा धुराळा केलेला पाहायला मिळाला. सुरूवातला यशस्वी जयस्वाल याने तर त्यानंतर सूर्याने चालवलेल्या दांडपट्ट्यासमोर आफ्रिकेच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 201-7  धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला सुुरूवातीपासूनच टीम इंडियाने धक्के दिले होते. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये टीम इंडियालाही झटका बसला होता.

टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. सूर्याला बाहेर नेण्यासाठी दोन जणांची मदत घ्यावी लागली होती. चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या सूर्याला अशा अवस्थेत बाहेर नेलं जात असल्याने अनेकांना धक्का बसला. टी-20 क्रिकेटचा बादशहा म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं त्यामुळे टी-वर्ल्ड कप आधी त्याला दुखापत होणं हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादव आता फिट असून सामना संपल्यानंतर बोलताना आपण फिट असून आता व्यवस्थित चालता येत असल्याचं सूर्यकुमार यादव याने सांगितलं. सूर्याने टी-20 चा बादशहा का म्हणतात हे कालच्या शतकी खेळीनंतर सर्वांना दाखवून दिलं.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.