SA vs IND 1st T20i : वर्ल्ड कप फायनलनंतर इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, सामना किती वाजता?
India vs South Africa 1st T20i Live Streaming : टीम इंडियाची युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर आमनेसामने असणार आहेत.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवून टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. त्यानंतर आता वर्ल्ड कप विजेता भारत आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज आहेत. उभयसंघात एकूण 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मार्करम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची सूत्रं आहेत. हा पहिला सामना कुठे आणि कधी पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना शुक्रवारी 8 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना डरबन येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 8 वाजता टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.