IND vs SA : दक्षिण अफ्रिकेत भारतीय खेळाडूंनी डोक्यावर बॅग घेऊन काढला पळ, Video सोशल मीडियावर

टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी20 वर्ल्डकप 2024 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना भारतीय खेळाडूंना दक्षिण अफ्रिकेच्या धरतीवर पाय ठेवताच वेगळीच प्रचिती आली. खेळाडूंना डोक्यावर बॅग घेऊन पळ काढावा लागला.

IND vs SA : दक्षिण अफ्रिकेत भारतीय खेळाडूंनी डोक्यावर बॅग घेऊन काढला पळ, Video सोशल मीडियावर
IND vs SA : डरबनमध्ये भारतीय खेळाडूंचं असं स्वागत! दक्षिण अफ्रिकन धरतीवर पाय ठेवताच डोक्यावर बॅग घेऊन पळापळ Watch Video
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 6:29 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा ट्रॅकवर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 जिंकली असून आता दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्याची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणा आहे. भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेत पोहोचल्याचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत हँडलवरून पोस्ट केला आहे. यात सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग आणि इतर खेळाडूंचं जोरदार स्वागत केल्याचं दिसत आहे. पण एक वेळ अशी आली की भारतीय संघांच्या खेळाडूंना डोक्यावर बॅग घेऊन पळावं लागलं. त्याचं कारण म्हणजे डरबनमध्ये पडत असलेला पाऊस. पावसापासून बचाव करणअयासाठी खेळाडूंनी डोक्यावर बॅग घेतल्या आणि पळ काढला. बीसीसीआयच्या या व्हिडीओतील त्या क्षणाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

7 डिसेंबरला भारतीय खेळाडू डरबनला पोहोचले. डरबनमध्ये पाऊस पडत होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंना बसमध्ये चढण्यासाठी डोक्यावर बॅग घेऊन पळावं लागलं. हॉटेलमध्ये पोहोचताच भारतीय शैलीत खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा मूड एकदम बदलला. 10 डिसेंबरला भारतीय संघ पहिला टी20 सामना खेळणार आहे. त्यनंतर 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरु होईल. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिली कसोटी असेल. कसोटीसाठी वरिष्ठ खेळाडूंचं संघात पुनरागमन होईल.

तीन टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर , रवि बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर.

कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.