AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: टीम इंडियासाठी धोका वाढला! ‘तो’ परत येतोय, चौथ्या T 20 मध्ये खेळण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सामना जिंकून मालिका खिशात घालायची आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.

IND vs SA: टीम इंडियासाठी धोका वाढला! 'तो' परत येतोय, चौथ्या T 20 मध्ये खेळण्याची शक्यता
Team India Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 16, 2022 | 5:07 PM
Share

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) उद्या राजकोट येथे चौथा टी 20 सामना होईल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सामना जिंकून मालिका खिशात घालायची आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या मॅचआधी टीम इंडियाला आणखी सावध व्हाव लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डि कॉक ( Quinton de Kock) चौथ्या सामन्यात खेळू शकतो. मागचे दोन सामने डि कॉक दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज एडन मार्करामला (Aiden Markram) कोविड-19 ची लागण झाली. त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतच खेळणार नाहीय. क्विंटन डि कॉक डावखुरा फलंदाज असून तो सलामीला येतो. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. आयपीएलमध्ये डेब्यु करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाकडून तो खेळतो.

पहिला सामना खेळला होता

दक्षिण आफ्रिकन मीडिया रिपोर्ट्सच्या वृत्तानुसार, क्विंटन डि कॉक चौथ्या टी 20 सामन्यासाठी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. डि कॉक पहिला सामना खेळला. पण नंतरचे दोन सामने तो मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत हेनरिक क्लासनला संधी मिळाली. ज्याने मिळालेल्या चान्सचा अचूक लाभ उठवला.

धोका पत्करणार नाही, असं म्हटलं होतं

आगामी इंग्लंड दौरा लक्षात घेता, क्विंटन डि कॉक संपूर्ण मालिकेतूनच माघार घेऊ शकतो, अशी चर्चा होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख ग्रॅमी स्मिथ यांनीच तसे संकेत दिले होते. “मी जे ऐकलय त्यानुसार दुखापत थोडी गंभीर आहे. पुढच्या सामन्यात खेळण्याचा तो धोका पत्करेल अस मला वाटत नाही. इंग्लंड दौरा लक्षात घेता दक्षिण आफ्रिका धोका पत्करणार नाही” असं स्मिथ स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले होते.

त्याच खेळणं दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचं

आता दक्षिण आफ्रिकेच्या गोटातून आलेल्या वृत्तानुसार, क्विंटन डि कॉकमध्ये सुधारणा झाली असून तो चौथ्या टी 20 सामन्यात खेळू शकतो. सामना महत्त्वचा असल्याने क्विंटन डि कॉकच खेळणं दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.