AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : श्रेयस अय्यरची ‘ही’ चूक ठरली भारताच्या अपयशाचं कारण, टीम इंडिया इतिहास रचण्यात अपयशी, जाणून घ्या पराजयाची कारणं…

मिलरने 31 चेंडूत नाबाद 64धावा केल्या. यात 4 चौकार आणि 5 षटकार आहेत.

IND vs SA : श्रेयस अय्यरची 'ही' चूक ठरली भारताच्या अपयशाचं कारण, टीम इंडिया इतिहास रचण्यात अपयशी, जाणून घ्या पराजयाची कारणं...
श्रेयस अय्यरImage Credit source: social
| Updated on: Jun 10, 2022 | 6:58 AM
Share

मुंबई :  काल भारतीय संघ (IND) इतिहास रचण्यात अपयशी ठरला आणि टी 20मध्ये दक्षिण अफ्रिकेनं (SA) भारतावर 7 गडी राखून विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात किलर मिलर आणि रासी व्हॅन डर ड्युसेन चमकले. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर भारताच्या पराभवात विलिन ठरलाय. टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना 211 धावांची मोठी मजल मारली. डेव्हिड मिलर आणि वेन डर ड्युसेन यांच्या खेळीमुळे पाहुण्या संघाला पाच चेंडू बाकी असताना लक्ष्याचा पाठलाग करता आला. भारताने दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) विजयासाठी 212 धावांचं विशाल लक्ष्य दिलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेने आरामात हे टार्गेट पार केलं. डेविड मिलर (David Miller) आणि रासी वॅन डर डुसे (Rassie van der Dussen) दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक ठरले.

सामन्यात नेमकं काय झालं?

डेव्हीड आणि रासी वॅन डर डुसे या दोघांनी भारताच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नाही. अत्यंत सहजपणे त्यांनी भारताची गोलंदाजी फोडून काढली. मिलरने 31 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 4 फोर आणि 5 सिक्स आहेत. डुसे 46 चेंडूत नाबाद 75 धावा तडकावल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार आहेत. आधी डेव्हिड मिलरने किलर अंदाज दाखवला. त्यानंतर डुसे भारतीय बॉलर्सवर तुटून पडला. आवेश खानच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने मिडविकेटला डुसेचा झेल सोडला. तो भारताला खूपच महाग पडला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 131 धावांची भागीदारी केली. डुसे-मिलर जोडीने मैदानावर फोर, सिक्सचा पाऊस पडला. दोघांना कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची हा भारतीय गोलंदाजांना प्रश्न पडला होता.

श्रेयसची ही चूक पडली महागात

15व्या षटकापर्यंत सामना सुरू होता. दक्षिण आफ्रिकेनं 3 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या आणि विजयापासून अजूनही 63 धावा दूर होत्या. यावेळी डेव्हिड मिलरनं 50 चेंडूत 29 आणि ड्युसेननं 30 चेंडूत 30 धावा केल्या. 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ड्युसेननं हात उघडण्याचा प्रयत्न केला आणि मिड-विकेटच्या दिशेनं एक शॉट खेळला. तिथं असलेल्या श्रेयस अय्यरनं एक साधा झेल सोडला आणि इथून टीम इंडियाच्या पराभवाची सुरुवात सुरू झाली. डुसेननं याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पुढच्या 15 चेंडूत 45 धावा केल्या. डुसेननं 46 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 75 धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या या चुकीमुळे सलग 13 टी-20 सामने जिंकून इतिहास रचण्यात भारताला मुकावं लागलं.

ड्युसेनशिवाय डेव्हिड मिलरनंही दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मिलरनं भारताविरुद्धच्या या सामन्यात 22 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 31 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षानंतर मिलरचा किलर फॉर्म पाहायला मिळाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 12 जून रोजी कटक येथे खेळवला जाणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.