Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, 1st ODI: अखेर पहिल्या वनडे मध्ये मुंबई-पुण्याच्या प्रमुख खेळाडूंना संधी नाहीच

आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करतोय. विराट कोहली प्रथमच एक सामन्य खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.

IND vs SA, 1st ODI: अखेर पहिल्या वनडे मध्ये मुंबई-पुण्याच्या प्रमुख खेळाडूंना संधी नाहीच
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 2:01 PM

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करतोय. विराट कोहली प्रथमच एक सामन्य खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. पहिल्या वनडेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसंच घडलं. आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड ऐवजी पुन्हा एकदा अनुभवाला प्राधान्य देत शिखर धवनवर विश्वास दाखवण्यात आला आहे. खरंतर ऋतुराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स विजय हजारे वनडे टुर्नामेंटमध्ये पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चार शतक झळकावली आहेत. त्याने 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याशिवाय आयीपएल 2021 मध्ये सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. त्याचवेळी शिखर धवनने पाच सामन्यात फक्त 56 धावा केल्या आहेत. दोघेही सलामीवीर म्हणून खेळतात.

सूर्यकुमार यादवलाही स्थान नाही मधल्या फळीत मुंबईच्याच दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर. टीम मॅनेजमेंटने अय्यरला संधी दिली आहे. त्यामुळे सूर्यकुमारला अजून वाट पहावी लागले. स्थानिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवनेही खोऱ्याने धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा तो प्रमुख खेळाडू आहे. वेंकटेश अय्यरने वनडेमध्ये डेब्यु केला आहे. ऑलराऊंडर म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आलाय.

ind vs sa south africa wins toss batting first Maharashtra ruturaj gaikwad & suryakumar yadav not included in side

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.