IND vs SA : पहिल्या टी20 सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन, जाणून कोणाला मिळणार संधी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर भारत आणि दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेत आमनेसामने येणार आहे. 8 नोव्हेंबरपासून मालिका सुरु होणार आहे. भारतीय दक्षिण अफ्रिकेत असून डरबनच्या किंग्समीडमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

IND vs SA : पहिल्या टी20 सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन, जाणून कोणाला मिळणार संधी
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 8:26 PM

भारताने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. सध्या टी20 संघाचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेत संघाला विजयाच्या वेशीवर पोहोचवलं होतं. तो क्षण आजही भारतीय क्रीडारसिकांच्या मनात घर करून आहे. आता चार महिन्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये 4 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. टी20 संघाची धुरा आता सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना 8 नोव्हेंबरला डरबनच्या किंग्समीड येथे होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात खेळलेल्या खेळाडूंना या संघात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा युवा संघ निवडला गेला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंची निवड दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी झाली आहे. त्यामुळे या मालिकेतही विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा उतरण्याची शक्यता आहे. तिलक वर्माची मोठ्या कालावधीनंतर संघात एन्ट्री झाली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव उतरेल.

पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्या येईल आणि सहाव्या क्रमांकावर मॅच फिनिशरची भूमिका बजावणारा रिंकु सिंह उतरेल यात शंका नाही. कारण या दोघांमध्ये झटपट धावा करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर प्लेइंग 11 मध्ये अक्षर पटेललाही स्थान मिळू शकतं. गोलंदाजीचं बोलायचं तर हार्दिक पांड्या असल्याने दोन वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल. तसेच फिरकीची जबाबदारी रवि बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीच्या खांद्यावर असू शकते. त्यामुळे भारताकडे गोलंदाजीचे सहा पर्याय असतील. अर्शदीप, आवेश खान, हार्दिक पांड्या यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची, तर वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई आणि अक्षर पटेल फिरकीची धुरा सांभाळतील.

दक्षिण अफ्रीकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि आवेश खान.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.