Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी असू शकते भारताची प्लेइंग-11, वाट पाहणच पुणेकर मुलाच्या नशिबी?

IND vs SA T20 Series: निवड समितीने यावेळी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा सारख्या सीनियर खेळाडूंना आराम दिला आहे.

IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी असू शकते भारताची प्लेइंग-11, वाट पाहणच पुणेकर मुलाच्या नशिबी?
Team india T 20 squad for south Africa Series Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:03 AM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) आगामी पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ नव्या अंदाजात दिसणार आहे. BCCI ने या सीरीजसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने यावेळी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा सारख्या सीनियर खेळाडूंना आराम दिला आहे. त्याऐवजी IPL 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलला कर्णधार बनवलं आहे. ऋषभ पंत व्हाइस कॅप्टन आहे. 18 सदस्यीय संघातून प्लेइंग-11 निवडण केएल राहुल आणि टीम मॅनेजमेंटसाठी सोपं नसेल. भारताला सलग 13 वा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे. त्यामुळे उमरान आणि अर्शदीपला संधी मिळण्याची शक्यता कठीण दिसतेय.

इशान किशन-ऋतुराज गायकवाडमध्ये कोणाला संधी?

टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यास सक्षम असलेल्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलं आहे. कॅप्टन केएल राहुल सोबत ऋतुराज गायकवाड किंवा इशान किशन या दोघांपैकी एकाला सलामीला येण्याची संधी मिळू शकते. IPL च्या यंदाच्या सीजनमध्ये गायकवाड आणि किशन या दोघांकडून भरपूर अपेक्षा होत्या. त्यांना त्या सर्व अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. पण त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. राइट हँड-लेफ्ट हँड कॉम्बिनेशनचा विचार करता, संघ व्यवस्थापन राहुल सोबत इशान किशनला सलामीला पाठवू शकते.

Ruturaj gaikwad

Ruturaj gaikwad

कोहलीच्या जागी श्रेयसला संधी

कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर फलंदाजीला येऊ शकतो. संघाकडे त्याशिवाय पर्यायही नाहीयत. आयपीएलमध्ये केकेआरचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने 134.56 च्या स्ट्राइक रेटने 401 धावा केल्या आहेत. नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप आधी श्रेयस अय्यरकडे स्वत:ला सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे.

KKR Captain Shreyas iyer

भारताची मधली फळी मजबूत

ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्यामुळे भारताची मधली फळी मजबूत दिसतेय. ऋषभ चौथ्या, कार्तिक पाचव्या आणि हार्दिक सहाव्य़ा नंबरवर फलंदाजीला येऊ शकतो. पंड्या आणि कार्तिक शानदार फॉर्ममध्ये आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये त्यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दिनेश कार्तिक

गोलंदाजीत अनुभवाची कमतरता

फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजी विभागात अनुभवाची कमतरता जाणवतेय. भुवनेश्वर कुमारच्या रुपात भारताकडे एका अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंके विरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलला संधी मिळू शकते. आवेश खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह हे वेगवान गोलंदाज सुद्धा संघाकडे आहेत. पण त्यांना सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. रवी बिश्नोई, कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज संघाकडे आहेत. त्याशिवाय युजवेंद्र चहलही संघाकडे आहे.

bhuvneshwar kumar1

भुवनेश्वर कुमार

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असू शकते संभाव्य प्लेइंग 11

केएल राहुल (कॅप्टन), इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, आवेश खान/कुलदीप यादव

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.