AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या मनात भारताच्या दोन गोलंदाजांची भिती, कॅप्टन टेंबा बावुमाने दिली स्पष्ट कबुली

IND vs SA T20 Series: येत्या गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच T 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ याच आठवड्यात भारतात दाखल झाला आहे.

IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या मनात भारताच्या दोन गोलंदाजांची भिती, कॅप्टन टेंबा बावुमाने दिली स्पष्ट कबुली
दक्षिण आफ्रिका संघImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 11:09 AM

IND vs SA T20 Series: येत्या गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच T 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ याच आठवड्यात भारतात दाखल झाला आहे. भारताने या मालिकेसाठी आपल्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा हे अव्वल खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. IPL 2022 मध्ये दर्जेदार खेळ दाखवणाऱ्या युवा खेळाडूंना मालिकेत संधी देण्यात आली आहे. भारताकडून अनेक युवा चेहरे या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. भारताने सलग 12 T 20 सामने जिंकेल आहेत. 13 वा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी भारताकडे आहे. भारताला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापासून रोखण्याचं आमच्यासमोर लक्ष्य आहे, असं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने म्हटलं आहे.

त्या दोघांची भिती

भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांची धास्ती वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी दुकलीची भिती वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने तशी कबुलीच दिली आहे. टीम मीटिंगमध्येही दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज या दोघांचा कसा सामना करायचा, त्यावर चर्चा करतात असं बावुमाने सांगितलं.

टीम मीटिंगमध्ये आम्ही त्यांच्याबद्दलच बोलतो

“आम्ही याआधी कुलदीप आणि चहलच्या फिरकी गोलंदाजीचा सामना केला आहे. यावेळी आम्ही त्यांची गोलंदाजी समजून घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने खेळू अशी अपेक्षा आहे. आमचे खेळाडू व्यक्तीगत आणि टीम मीटिंगमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा करतात” असं बावुमा म्हणाला.

आम्ही वर्चस्व गाजवू

“सीनियर खेळाडूंचा अनुभव त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची संघातील तरुण खेळाडू कशी अमलबजावणी करतात, ते महत्त्वाच आहे. मागची दीड वर्ष आम्ही फिरकी गोलंदाजी ज्या पद्धतीने खेळलो आहोत, त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. यावेळी आम्ही फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवू” असं बावुमा म्हणाला.

IPL मध्ये ‘कुलचा’च राज्य

नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीजनमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी दमदार कामगिरीच प्रदर्शन केलं. आपल्या फिरकीच्या तालावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नाचवलं. चहलने 27 विकेट घेऊन पर्पल कॅप आपल्या नावावर केली, तर कुलदीपने 20 पेक्षा जास्त विकेट घेतले.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.